नवी दिल्ली : भारताचा माजी डावखुरा गोलंदाज आणि सध्या समालोचक असलेला इरफान पठाण याने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना चोख उत्तर दिले. पराभवानंतर काही भारतीय खेळाडू परतले. यादरम्यान पराभवाची कारणमीमांसा सुरू आहे. त्याचवेळी इरफानने शेजारच्या पंतप्रधानांना जशास तसे उत्तर देत ‘आपमें और हममें यही फर्क है’ असे म्हटले आहे.भारताच्या पराभवानंतर शरीफ यांनी ट्विट करीत येत्या रविवारी १५० वि. १७० यांच्यात सामना खेळला जाईल, असे लिहून भारताला डिवचले होते. शरीफ यांनी २०२१ ला पाकने भारताला दहा गड्यांनी तसेच गुरुवारी इंग्लंडने भारताला दहा गड्यांनी नमविल्याचा संदर्भ दिला होता. यावर इरफानने ट्विट करीत लिहिले, ‘आपमें और हममें फर्क है. आम्ही आपल्या आनंदावर आनंदी असतो तर तुम्ही दुसऱ्याच्या दु:खावर. त्यामुळेच स्वत:चा देश सुधारण्यावर तुमचे लक्ष नाही.’ याआधी इरफानने लिहिले होते, ‘शेजाऱ्यांचे विजय होतच असतात पण ‘ग्रेस’ तुमच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ‘आपमें और हममें यही फर्क है’: इरफान पठाणचे पाकिस्तानी पंतप्रधानांना चोख प्रत्युत्तर
‘आपमें और हममें यही फर्क है’: इरफान पठाणचे पाकिस्तानी पंतप्रधानांना चोख प्रत्युत्तर
Irfan Pathan : भारताचा माजी डावखुरा गोलंदाज आणि सध्या समालोचक असलेला इरफान पठाण याने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना चोख उत्तर दिले.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 5:58 AM