सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ऐतिहासिक विजय मिळवला. आता या पाराभवाची परतफेड करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ उत्सुक आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील मालिकेला रविवारपासून ट्वेंटी-20 मालिकेनं सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार अॅरोन फिंचला कारवाईला सामोरे जावे लागले. बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात लेव्हल -1 नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी फिंच दोषी आढळला आहे.
32 वर्षीय फिंचने 2.1.2 च्या कलमांचा उल्लंघन केला आणि त्याने मैदानावरील सामन्यांची तोडफोड केली. बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात मेलबर्न रेनेगेड्सचा कर्णधार फिंचला मेलबर्न स्टार्सविरुद्ध राग आवरता आला नाही. अंतिम सामन्यात तो 13 धावांवर तो धावबाद झाला, परंतु बाद झाल्याचा राग त्याने खुर्चीवर काढला आणि त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला.
याबाबत फिंच म्हणाला की, " आम्हाला भारतामध्ये येऊन पराभवाचा बदला घ्यायचा आहे. त्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. भारताविरुद्धच्या सामन्यात पूर्ण आत्मविश्वाने उतरलो तर विजय आमचाच असेल. त्याचबरोबर आम्ही या दौऱ्यासाठी खास रणनीती आखली आहे. या रणनीतीची योग्य अंमलबजावणी झाली तर भारताचा पराभव निश्चित होऊ शकतो. "