Join us  

Aaron Finch: शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आरोन फिंचने केले निराश; टीम साउदीने काढला त्रिफळा

ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आरोन फिंचने निवृत्ती घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 2:28 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (AUS vs NZ) यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. कांगारूच्या संघाने मालिकेतील पहिले २ सामने जिंकून २-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आरोन फिंचने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. आरोन फिंच मागील मोठ्या कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत आला आहे. आज खेळलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यातून फिंचने चाहत्यांना निराश केले आहे. कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात आरोन फिंच केवळ ५ धावा करून बाद झाला. त्याला टीम साउदीने बाद केले. 

टीम साउदीने काढला त्रिफळादरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात आरोन फिंच नेहमीप्रमाणे सलामीला आला आणि तो १३ चेंडूत ५ धावा काढून टीम साउदीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. फिंच यंदाच्या वर्षातील १४ वा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता, परंतु त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. लक्षणीय बाब म्हणजे यंदाच्या वर्षात तो तब्बल ५ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

आरोन फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता बनला होता. मात्र सध्या खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या फिंचने न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत केवळ १० धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात ५ धावा तर दुसऱ्या सामन्यात खाते न उघडताच तो तंबूत परतला होता. या सामन्यात केलेल्या ५ धावांच्या जोरावर त्याने संपूर्ण मालिकेत १० धावांची दुहेरी धावसंख्या उभारली आहे. एकदिवसीय क्रिकेटला रामराम केले असले तरी आरोन फिंच टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये खेळताना दिसणार आहे.

फिंचचा एकदिवसीय क्रिकेटला रामराम आरोन फिंचच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने २०१३ मध्ये ५० षटकांच्या या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो १४६ सामने खेळला आहे. त्यातील १४२ डावांमध्ये त्याने ३ वेळा नाबाद राहून ५,४०६ एवढ्या धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १५३ आहे. ज्यात १७ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे.

 

टॅग्स :अ‍ॅरॉन फिंचआॅस्ट्रेलियान्यूझीलंडआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App