Join us  

IPL Auction : छोटा पॅकेट बडा धमाका! लिलावात गुजरातच्या खेळाडूवर मोठी बोली लागण्याची शक्यता

आर्य २० लाख रूपयांच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या रिंगणात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 5:09 PM

Open in App

Aarya Desai IPL 2024 : आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत असून, १९ डिसेंबरला दुबईत मिनी लिलाव होणार आहे. या लिलावाच्या मैदानात अनेक युवा खेळाडू आहेत. एखाद्या खेळाडूला राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी अथवा स्वत:ला सिद्ध करून दाखवण्यासाठी आयपीएल हे मोठे व्यासपीठ आहे. इथे अप्रतिम खेळी करून प्रसिद्धी मिळवलेले अनेक खेळाडू आहेत. नेहमीप्रमाणे यंदा देखील काही युवा खेळाडूंवर लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. यातीलच एक नाव म्हणजे आर्य देसाई. आर्य देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातच्या संघाकडून खेळतो. 

आयपीएलच्या लिलावात अनकॅप्ड खेळाडूंवर देखील मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. आर्यचे नाव या शर्यतीत आहे, तो मागील हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा भाग होता. मात्र, त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळाली नाही. एक बॅकअप म्हणून आर्यकडे आयपीएल फ्रँचायझी आकर्षित होऊ शकतात. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही करण्याची क्षमता असलेला आर्य २० लाख रूपयांच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या रिंगणात आहे. 

२० लाख रूपयांच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या रिंगणातआर्य देसाईची आतापर्यंतची देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारी पाहिली तर एक प्रभावी अष्टपैलू म्हणून त्याने कामगिरी केली आहे. आर्यला वरिष्ठ खेळाडूंसोबत फारसे खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या सहा डावांत १५१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक अर्धशतक झळकावले. गोलंदाजीची संधी मिळाली असली तरी आर्यला बळी घेण्यात मात्र अद्याप यश आले नाही. त्याने एकूण दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. याशिवाय आठ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये त्याने १७३ धावा कुटल्या.

कोलकाता नाइट रायडर्सने रिलीज केलेले खेळाडू - शाकिब अल हसन, लिटन दास, आर्य देसाई, डेव्हिड वीस, नारायण जगदीशन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दूल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टिम साऊदी, जॉन्सन चार्ल्स. 

कोलकाता नाइट रायडर्सने कायम राखलेले खेळाडू – नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर, जेसन रॉय, सुनील नारायण, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.  

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरातकोलकाता नाईट रायडर्स