वीरेंद्र सेहवाग… या नावाची दहशत एक दशकाहून अधिक काळ गोलंदाजांवर राहिली. वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक शैलीसमोर भल्याभल्या गोलंदाजांची लाईन-लेन्थ बिघडली. कसोटी क्रिकेटमध्ये सेहवागने त्रिशतकी खेळी खेळली जी आजही स्मरणात आहे. सेहवागने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता बरीच वर्ष झाली, पण आता त्याचा मुलगा आर्यवीर ( Aaryavir Sehwag) क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सेहवागचा मोठा मुलगा आर्यवीरला दिल्ली संघात संधी मिळाली.
विजय मर्चंट ट्रॉफी या १६ वर्षांखालील स्पर्धेसाठी दिल्ली संघात आर्यवीरनी निवड करण्यात आली आहे. आर्यवीर हा उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि त्याची शैली अगदी त्याच्या वडिलांसारखी आहे. सोशल मीडियावर आर्यवीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो उत्तुंग फटके मारताना दिसतोय. वडिलांप्रेमाणे आर्यवीरची शैली आहे.
दिल्लीचा संघ सध्या बिहारविरुद्ध खेळतोय, परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये आर्यवीरला संधी मिळालेली नाही. या सामन्यात दिल्ली संघाची फलंदाजी मात्र अप्रतिम होती. सलामीवीर सार्थक रेने १०४ चेंडूत १२८ धावांची खेळी केली.