Join us  

AB de Villiers : एबी डिव्हिलियर्स IPL 2023मधून कमबॅक करणार; RCBच्या ताफ्यात Mr. 360 पुन्हा दिसणार

दक्षिण आफ्रिकेचा सुपरस्टार एबी डिव्हिलियार्स ( AB de Villiers) याने आयपीएल २०२२आधी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 5:30 PM

Open in App

दक्षिण आफ्रिकेचा सुपरस्टार एबी डिव्हिलियार्स ( AB de Villiers) याने आयपीएल २०२२ आधी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. विशेष करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB ) चाहत्यांसाठी हा धक्का होता. एबी डिव्हिलियर्सला बंगळुरूने भरभरून प्रेम दिले आणि बंगळुरू हे आपले दुसरे घर असल्याचे एबीनेही अनेकदा मान्य केले आहे. आयपीएलची ११ पर्व एबी RCBकडून खेळला होता आणि त्याचा निर्णय बंगळुरूच्या चाहत्यांना दुःखी करणारा होता. पण, आयपीएल २०२२मध्ये RCB ने Mr 360 च्या रिप्लेसमेंटच्या रुपात दिनेश कार्तिकला ताफ्यात घेतले आणि त्यानेही कमालीची कामगिरी करून दाखवली.  

एबी डिव्हिलियर्सने RCBकडून १५७ सामन्यांत ४१.१०च्या सरासरीने ४५२२ धावा केल्या असून त्यात २ शतकं व ३७ अर्धशतकांचा समावेश आहे. RCB ने नुकतेच एबी डिव्हिलियर्स व ख्रिस गेल या माजी खेळाडूंचा Hall of Fameने सन्मान केला. त्यावेळी विराट कोहलीने ABD ने RCB मध्ये नवीन जबाबदारी स्वीकारावी अशी इच्छा व्यक्त केली होती. आज ABD ने आयपीएल २०२३मध्ये कमबॅक करणार असल्याचे जाहीर केले. ''विराट कोहलीला मी ही आनंदाची गोष्ट सांगितली आहे. मी नेमक्या कोणत्या भूमिकेत असेल याबाबत अद्याप काहीच ठरवलेले नाही. पण, पुढील वर्षी मी आयपीएलमध्ये दिसेन, हे नक्की. मी या सर्वांना खूप मिस केले,''असे एबी डिव्हिलियर्सने सांगितले.

तो पुढे म्हणाला,''लहान पक्षीचा आवाज मला ऐकू येतोय, तो मला सांगतोय की बंगळुरूत काही सामने होतील. त्यामुळे मला माझ्या दुसऱ्या घरी यायला आवडेल. चिन्नास्वामी स्टेडियम पूर्ण प्रेक्षक क्षमतेने भरलेले मला पाहायचे आहे. मी त्या क्षणाची वाट पाहतोय.''  

टॅग्स :आयपीएल २०२२एबी डिव्हिलियर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली
Open in App