दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज, Mr. 360 आणि ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट एबी डिव्हिलियर्सनंपाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेतली आहे. डिव्हिलियर्स हा पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्स संघाचा सदस्य होता. त्यानं कामाचा ताण सांभाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
सप्टेंबर महिन्यापासून डिव्हिलियर्स ट्वेंटी-20त खेळलेला नाही. त्यानं इंग्लंड येथे झालेल्या व्हीटालिटी ब्लास्ट ट्वेंटी-20 लीगमध्ये मिडलसेक्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर तो बिग बॅश लीगमध्ये ब्रिसबन हिट आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार आहे. पण, ब्रिसबन हिट संघाकडून एबी दुसऱ्या टप्प्यात खेळेल. पाकिस्तान सुपर लीगमध्ये न खेळण्याबाबत एबी म्हणाला,''केवळ कामाचा ताण सांभाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.''
पाकिस्तान सुपर लीगसाठीचा ड्राफ्ट 6 डिसेंबरला होणार होता. यामध्ये सहा संघांचा समावेश आहे. कलंदर संघानं गतसत्रात त्याला एबीला करारबद्ध केले होते. पण, पाठीच्या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या टप्प्यात खेळता आले नाही. त्यान सात सामन्यांत 54.50च्या सरासरीनं 218 धावा केल्या.
एबीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 114 कसोटी, 228 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्यात त्यानं अनुक्रमे 8765, 9577 आणि 1672 धावा कुटल्या आहेत. अन्य ट्वेंटी-20 सामन्यांत त्यानं 8186 धावा केल्या आहेत.