ab de villiers ipl 2023 । बंगळुरू : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल (IPL 2023) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामाची सुरूवात 31 मार्चपासून होत आहे. ही बहुचर्चित स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) त्यांचे दोन खेळाडू ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांना हॉल ऑफ फेमने सन्मानित केले. अशातच संघाचा माजी स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्सने एक भावनिक पोस्ट करून आठवणींना उजाळा दिला आहे.
एबी डिव्हिलियर्सने पोस्टच्या माध्यमातून म्हटले, "खरोखर कुठून सुरूवात करावी हे मला कळत नाही. असो, 26 मार्च 2023 रोजी ख्रिस आणि मला RCB हॉल ऑफ फेममध्ये सन्मानित करण्यात आले आणि आमचे जर्सी क्रमांक कायमचे निवृत्त झाले. माझी पत्नी, दोन मुले आणि लहान मुलगी पायऱ्यांवरून आरसीबीच्या कॅम्पमध्ये जात होती तेव्हा माझे मन भरून आले होते. मी अनेकदा या पायऱ्यांवरून प्रवास केला आहे, पण यावेळी पोटात गोळा आलेल्या अवस्थेत जाणे वेगळे वाटले."
एबी डिव्हिलियर्सची भावनिक पोस्ट "खचाखच भरलेल्या स्टेडियमच्या समोर असलेल्या चिन्नास्वामी येथील आमच्या ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीत गेल्यावर माझे डोळे भरून आले. एबीडीच्या घोषणांनी माझे स्वागत झाले हे आताच्या घडीला वेगळे होते. यावेळी माझ्या शरीरात भावनांचा समुद्र भरून आला कारण या शहराचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल अभिमान वाटतो. 2003 पासून भारतात घालवलेल्या माझ्या सर्व दिवसांचा विचार करताच अनेक खास आठवणी परत आल्या, मी या देशाशी आणि येथील लोकांचा सदैव ऋणी आहे. सहकाऱ्यांचे आभार खासकरून विराट धन्यवाद, धन्यवाद आरसीबी, धन्यवाद बंगळुरू", अशा शब्दांत डिव्हिलियर्सने आरसीबीच्या चाहत्यांसह भारतीयांचे आभार मानले.
आगामी IPL हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ - विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फॅफ ड्यू प्लेसिस, आकाश दीप, वनिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, फिन अॅलन, करन शर्मा, एस प्रभुदेसाई, अनुज रावत, सिद कौल, शाहबाज अहमद, रजत पाटिदार, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, जोश हेझलवूड, रिसे टॉप्ली, हिमांशू शर्मा, विल जॅक्स, मनोज भंडागे, राजन कुमार, अविनाश सिंद, सोनू यादव.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"