केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेचा सुपरस्टार क्रिकेटपटू एबी डी'व्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तरीही तो दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एक भाग होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने याबाबतचे संकेत दिले आहेत.
आगामी विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघ व्यवस्थापनाला डी'व्हिलियर्सकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण डी'व्हिलियर्सने निवृत्ती जाहीर केली आणि क्रिकेट मंडळासमोर पेच निर्माण झाला. पण या पेचातून क्रिकेट मंडळाने एक मार्ग काढला आहे.
डी'व्हिलियर्सच्या गुणवत्तेचा संघाला उपयोग व्हावा, यासाठी क्रिकेट मंडळाने एक युक्ती लढवली आहे. डी'व्हिलियर्सला संघाचे प्रशिक्षक किंवा सल्लागारपद दिले तर त्याचा गुणवत्तेचा चांगला वापर करता येऊ शकतो. त्यामुळे आता डी'व्हिलियर्स आता आपल्याला नव्या भूमिकेत दिसणार आहे.