Pakistan, Shadab Khan trolling: "आता हात खाली कर"; पाकिस्तानच्या शादाब खानने आपल्याच सहकाऱ्याला केलं ट्रोल

पाकिस्तानी खेळाडूने एक फोटो पोस्ट केला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 04:26 PM2022-06-03T16:26:48+5:302022-06-03T16:28:44+5:30

whatsapp join usJoin us
Ab Haath Neechay Ker Lo Pakistan Cricketer Shadab Khan Trolls Teammate On Twitter | Pakistan, Shadab Khan trolling: "आता हात खाली कर"; पाकिस्तानच्या शादाब खानने आपल्याच सहकाऱ्याला केलं ट्रोल

Pakistan, Shadab Khan trolling: "आता हात खाली कर"; पाकिस्तानच्या शादाब खानने आपल्याच सहकाऱ्याला केलं ट्रोल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan, Shadab Khan trolling: पाकिस्तानचा संघ मायदेशात खेळल्या जाणाऱ्या आगामी क्रिकेट मालिकेची तयारी करत आहे. वेस्ट इंडिजचा संघ पाकिस्तानमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डदेखील मोठ्या प्रमाणावर तयारी करताना दिसत आहे. याच मालिकेआधी पाकिस्तानी क्रिकेटपटू शादाब खान याने ट्वीटरवरून आपल्याच एका सहकाऱ्याची खिल्ली उडवली. पाकिस्तानचा खेळाडू हसन अली याने ट्वीटरवर एक फोटो पोस्ट केला होता, त्या फोटोवर त्याने मजेशीर कमेंट करत हशा पिकवला.

पाकिस्तानचा प्रतिभावान गोलंदाज हसन अली याने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले होते. त्या फोटोंमध्ये त्याने भगव्या रंगाचा टी-शर्ट घातला होता आणि हाताला सोनेरी रंगाचं घड्याळ होतं. फोटो पोस्ट केल्यानंतर त्याने कॅप्शनमध्ये काहीही लिहिलं नव्हतं. त्याच फोटोवर शादाब खानने कमेंट करत त्याची खिल्ली उडवली. "घड्याळ छान आहे. आता हात खाली कर", असं एका ओळीत त्याने हसन अलीला ट्रोल केलं.

दरम्यान, पाकिस्तानच्या आगामी मालिकेसाठी शादाब खान आणि मोहम्मद नवाझ या दोघांना पाकिस्तानच्या संघात पुन्हा स्थान मिळाले आहे. विंडिज विरूद्ध त्यांची वन डे मालिका रंगणार आहे. शाबाद खान हा २३ वर्षांचा तर नवाझ २८ वर्षांचा खेळाडू आहे. विंडिज विरूद्ध झालेल्या टी२० सिरिजमध्येही या दोघांना संघात संधी देण्यात आली होती. पण दोघेही दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटपासून दूर होते. आता ते तंदुरूस्त झाले असून त्यांना संघात स्थान मिळाले आहे.

विंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ- बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हरिस रौफ, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, शाहीन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहानी, जाहिद महमूद

Web Title: Ab Haath Neechay Ker Lo Pakistan Cricketer Shadab Khan Trolls Teammate On Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.