Join us  

केवळ गोरे लोकच हॅन्डसम नसतात, वर्णभेदावरून संतापला अभिनव मुकुंद

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा सलामीवीर अभिनव मुकुंद वर्णभेदाचा शिकार ठरला. त्याच्या रंगावरून सोशल मीडियावर अभद्र टिप्पणी करणा-या युझर्सना त्याने चांगलंच सुनावलं आहे.

By sagar.sirsat | Published: August 10, 2017 4:33 PM

Open in App
ठळक मुद्देरंगावरून सोशल मीडियावर अभद्र टिप्पणी करणा-या युझर्सना अभिनव मुकुंदने सुनावलं मी आज हे लिहीतोय ते तुमचं लक्ष्य वेधण्यासाठी नव्हे तर यामुळे लोकांचे विचार बदलतील म्हणूनलोकांनी मला अनेक नावं ठेवली, पण त्यावर मी फक्त हसून पुढे जाण्याचं काम केलं. कोणालाही उलट उत्तर दिलं नाही. पण आज मी केवळ माझ्यासाठीच नाही तर अन्य लोकांसाठीही बोलतोय

मुंबई, दि. 10 - भारतातील नागरीक परदेशांमध्ये गेल्यावर वर्णभेदाचे शिकार बनल्याच्या बातम्या सातत्याने येत असतात. तेथे होणा-या वर्णभेदी हल्ल्यांवर आपण सोशल मीडियावरून  वा अन्य कोणत्या माध्यमांतून टीका करत असतो. पण त्यावेळी आपल्याच देशात वर्णभेदाचे किती लोक शिकार होतात याचा आपण विचार करत नाही. नुकताच भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा सलामीवीर अभिनव मुकुंद वर्णभेदाचा शिकार ठरला. त्याच्या रंगावरून सोशल मीडियावर अभद्र टिप्पणी करणा-या युझर्सना त्याने चांगलंच सुनावलं आहे.

अभिनव मुकंदने केलेली पोस्ट- वयाच्या दहाव्या वर्षापासून मी क्रिकेट खेळता-खेळता आता मी इथपर्यंत प्रवास केला आहे. या स्थरावर देशाचं प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मी आज हे लिहीतोय ते तुमचं लक्ष्य वेधण्यासाठी नव्हे तर यामुळे लोकांचे विचार बदलतील म्हणून.  15 वर्षांचा असल्यापासून मला देशाबाहेर व देशांतर्गत अनेकदा फिरण्याची संधी मिळाली. माझ्या रंगामुळे अनेकांना असलेला तिरस्कार मी पाहिला. जो क्रिकेट खेळतो किंवा ज्याला क्रिकेट कळतं तो हे नीट समजू शकेल. क्रिकेट खेळण्यासाठई मी तळपत्या उन्हातही घाम गाळला आहे. पण त्यामुळे माझा रंग काळा होत असल्याची अजिबात खंत माझ्या मनात नाही. कारण मी जी गोष्ट मी करतो त्यावर माझं मनापासून प्रेम आहे आणि ते मिळवण्यासाठी मी तासनतास मेहनत घेतली आहे. लोकांनी मला अनेक नावं ठेवली, पण त्यावर मी फक्त हसून पुढे जाण्याचं काम केलं. कोणालाही उलट उत्तर दिलं नाही. पण आज मी केवळ माझ्यासाठीच नाही तर अन्य लोकांसाठीही बोलतोय...सोशल मीडिया आल्यापासून अशा गोष्टींचं प्रमाण वाढलंय,  वर्णभेदावरून अभद्र  टिप्पण्या कऱण्याचं प्रमाण वाढलंय, जे लोक सोशल मीडियात माझ्यासारख्या लोकांवर वर्णभेदाची टिप्पणी करतात त्यांनी आपला छोटा विचार बदलण्याची गरज आहे. केवळ गोरे लोकच हॅन्डसम असतात असं नाही असं अखेरीस लिहून त्याने रंगावरून टीका करणा-यांना चोख उत्तर दिलं आहे.