टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे आणि सोमवारपासून मिशनला सुरुवात होत आहे. टीम इंडिया 10 ऑक्टोबरला वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध वॉर्म-अप मॅच खेळेल, येथूनच ऑस्ट्रेलियामध्ये रणनीती आखण्यास सुरुवात होईल. यातच टीम इंडियाचा युवा विकेटकीपर ऋषभ पंत चर्चेत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. याचा संबंध चाहते ऋषभ पंतसोबत जोडत आहेत आणि सोशल मीडियावर गमतीशीर कॉमेन्ट्स करत आहेत. यातच आता काँग्रेस नेते आणि वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनीही यासंदर्भात गमतीशीर ट्विट केले आहे. 'ऋषभला एका चांगल्या वकीलाची आवश्यकता आहे,' असे अभिषेक मनु सिंघवी यांनी लिहिले आहे.
अभिषेक मनु सिंघवी यांनी रविवार दुपारी एक ट्विट करत लिहिले आहे, की ऋषभ पंत एका चांगल्या वकीलास पात्र आहे आणि त्याच्या बाजूने एक प्रतिबंधात्मक आदेश यायला हवा. अभिषेक मनु सिंघवी यांनी एवढेच लिहिले आहे. पण त्यांनी हे, नेमके कोण्या मुद्द्यासंदर्भात लिहिले आहे, हे सांगितलेले नाही.
मात्र, या ट्विटची टायमिंगच सर्व काही सांगून जाते. उर्वशी रौतेलाच्या पोस्टनंतर, ऋषभ पंत संदर्भात सोशल मीडियावर जो ट्रेंड सुरू होता. हे त्याच्याशीच संबंधित वाटते. फॅन्सनीही अभिषेक मनु सिंघवी यांच्या ट्विटवर गमतीशीर रिप्लाय दिले आहेत. तसेच, वर्ल्डकपसाठी हे अत्यंत आवश्यक झालं आहे, असे म्हटले आहे.