मुंबई : आयपीएल स्पर्धेला 23 मार्चपासून सुरु होत आहे. पण आयपीएल सुरु होण्यापूर्वीच या लीगचा ज्वर चढू लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज क्रिकेटपटू ए बी डी' व्हिलियर्स यांच्या पोस्टरवर दुधाचा अभिषेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता चांगलाच वायरलही झाला आहे.
हा पाहा वायरल झालेला व्हिडीओ
आयपीएलमधील दहा महागडे खेळाडूयुवराज सिंग - दिल्ली डेअरडेव्हिल्स 16 कोटी ( 2015)बेन स्टोक्स - पुणे सनरायजर्स 14.5 कोटी ( 2017)युवराज सिंग - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 कोटी ( 2014)बेन स्टोक्स - राजस्थान रॉयल्स 12.5 कोटी ( 2018)दिनेश कार्तिक - दिल्ली डेअरडेव्हिल्स 12.5 कोटी ( 2014)जयदेव उनाडकट - राजस्थान रॉयल्स 11.5 कोटी ( 2018)गौतम गंभीर - कोलकाता नाईट रायडर्स 11.4 कोटी ( 2011)लोकेश राहुल - किंग्ज इलेव्हन पंजाब 11 कोटी ( 2018)दिनेश कार्तिक - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 10.5 कोटी ( 2015)रवींद्र जडेजा - चेन्नई सुपर किंग्ज 9.72 कोटी ( 2012)
मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. 23 मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) केली होती. आयपीएलच्यावेळी भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. पण बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे मत व्यक्त केले होते. पण, त्यावेळी त्यांनी वेळापत्रक जाहीर केले नव्हते.
सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर निवडणूक होतील. 30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. 2009 मध्ये निवडणुकांमुळे संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती, तर 2014 मध्ये स्पर्धेचा काही टप्पा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात आला होता.
आयपीएलमधील 10 महागडे खेळाडू, तुम्हाला माहित आहेत का?इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी जयपूर येथे झाला. 70 जागांसाठी 346 हून अधिक खेळाडू रिंगणात होते. त्यात सर्वाधिक भाव खाल्ला तो वरुण चक्रवर्ती, जयदेव उनाडकट यांनी. पण आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागड्या खेळाडूचा मान अजूनही युवराज सिंगच्या नावावर आहे. 2015 मध्ये त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्स ( सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाने 16 कोटींत घेतले होते.