Join us  

स्मृतीच्या 'सोनेरी' कामगिरीचं जय शहांकडून अभिनंदन; पण 'इंग्लिश'वरून नेटकऱ्यांनी घेतली शाळा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 12:36 PM

Open in App

jay shah praised smriti mandhana :  आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले. अंतिम सामन्यात शानदार खेळी करून विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्मृती मानधनाचे बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी कौतुक केले. तसेच शहा यांनी भारतीय संघाचे अभिनंदन करताना बीसीसीआयच्या क्रांतिकारी निर्णयाचा उल्लेख केला. "बीसीसीआयने महिला आणि पुरूष खेळाडूंना समान वेतन देण्याचा निर्णय घेतला. या क्रांतिकारी निर्णयानंतर यूएस ओपन टेनिस, इंग्लिश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने देखील आमच्या पावलावर पाऊल टाकले", असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, बीसीसीआय सचिव जय शहा यांनी उपस्थितांना संबोधित करताना इंग्लिशमध्ये भाषण केले, ज्यावरून नेटकरी त्यांची खिल्ली उडवत आहेत. खरं तर जय शहा यांनी संपूर्ण भाषण वाचून दाखवले. याचाच दाखला देत नेटकऱ्यांनी त्यांना लक्ष्य केले. काहींनी इंग्लिशची खिल्ली उडवताना अडखळत बोलणाऱ्या शहांना सुनावले.

जय शहा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर 

BCCI चा ऐतिहासिक निर्णयभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२२ मध्ये क्रिकेटपटूंच्या वेतनाबाबत मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे पुरूष आणि महिला खेळाडूंना समान मॅच फी दिली जाते. 

भारतीय महिलांची 'सोनेरी' कामगिरी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकले. या विजयात स्मृती मानधनाने मोलाची भूमिका बजावली. सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत सोनेरी कामगिरी केली. भारताने सुवर्ण पदक पटकावले, तर श्रीलंकेला रौप्य आणि बांगलादेशला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात भारताने ११६ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात श्रीलंकेला निर्धारित २० षटकांत केवळ ९७ धावा करता आल्या.

टॅग्स :आशियाई स्पर्धा २०२३जय शाहबीसीसीआयट्रोलऑफ द फिल्ड