ACC Emerging Asia Cup Final च्या अंतिम सामन्यात भारत विरूद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात लढत रंगली आहे. तय्यब ताहीरचे दमदार शतक (१०८) आणि सैम अयूब, साहीबजादा फरदान यांच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने भारताला ५० षटकांत ३५३ धावांचे आव्हान दिले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने १२१ धावांची सलामी दिली होती. त्यानंतर पुढील चार विकेट झटपट गेल्या. पण तैय्यब ताहीरने मुबासीर खानच्या साथीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने ३५०पार मजल मारली.
--
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत असताना, सैम अयूब आणि साहीबजादा फरहान यांनी १२१ धावांची सलामी दिली. अयूबने ५१ चेंडूत ५९ धावा केल्या. तर फरहानने ६२ चेंडूत ६५ धावा केल्या. त्यानंतर ओमर युसूफ (३५), कासीम अक्रम (०), मोहम्मद हॅरिस (२), मुबासीर खान (३५), मेहरान मुमताझ (१३) हे फारशी चांगली खेळी करू शकले नाहीत. तय्यब ताहीरने मात्र ७१ चेंडूत १०८ धावा कुटल्या. त्याने १२ चौकार आणि ४ षटकारांची बरसात केली. त्याच्यामुळेच पाकिस्तानच्या संघाने ३५२ धावांपर्यंत मजल मारली. भारताच्या राजवर्धन हंगर्गेकर आणि रियान परागने प्रत्येकी २ तर हर्शित राणा, मानव सुतार आणि निशांत सिंधूने प्रत्येकी १-१ बळी टिपला.
Web Title: ACC Emerging Asia Cup Final IND vs PAK Pakistan Tayyab Tahir century Team India needs 353 Runs to win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.