आशिया चषक ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेच्या भवितव्याबाबत आशियाई क्रिकेट परिषद ( एसीसी) आणि संलग्न संघटना यांच्यात सोमवारी व्हिडीओ कॉन्फरंसीगद्वारे बैठक पार पडली. कोरोना व्हायरसमुळे याही स्पर्धेवर अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे ही स्पर्धा स्थगित केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तान क्रिकेट मंडळ भूषविणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध पाहता ही स्पर्धा दुबईत होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या निर्णयाची प्रतीक्षा पाहण्याचा निर्णय बैठकीत झाला.
आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत आशिया चषक हा महत्त्वाचा मुद्दा होता. कोरोना व्हायरसचे संकट पाहता ही स्पर्धा एकतर सुरक्षित ठिकाणी खेळवण्याचा किंवा स्थगित करण्याचा विचार सुरू आहे. पण, या बैठकीत ठोस निर्णय झालाच नाही. बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात जो निर्णय होईल, त्यानंतर आशिया चषक स्पर्धेचही भवितव्य ठरेल.
बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भुषविले. त्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिन जय शाह यांनीही सहभाग घेतला होता. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत यंदाच्या आशिया चषक स्पर्धेसह 2022च्या स्पर्धेचीही चर्चा झाली. ही स्पर्धा चीनमध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या तयारीचा अहवाल मांडण्यात आला.
IPL 2020साठी संधी
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि आशिया चषक रद्द झाल्यास बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा खेळवण्यास संधी मिळेल. त्यामुळे आयपीएल न झाल्यास होणारे 4000 कोटींचे नुकसान टाळले जाऊ शकेल. आयपीएल आयोजनासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळ आणि संयुक्त अरब अमिराती यांनी बीसीसीआयकडे प्रस्ताव ठेवला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Most Expensive: पत्नीला घटस्फोट देणं खेळाडूंना पडलं 'महागात'; पोटगीची किंमत ऐकून चक्रावेल डोकं!
OMG : इटालियन फुटबॉल फॅन्सच्या चाहत्या अँकरच्या घरी चोरी; 1.27 कोटींच्या वस्तू लंपास!
Broom Broom... महेंद्रसिंग धोनीचं Bike कलेक्शन अन् त्यासाठी उभारलाय अलिशान बंगला!
मन विषण्ण करणारी घटना; पाण्याच्या टाकीत 13 माकडं मृतावस्थेत, विषप्रयोगाचा संशय
इशांत शर्मा अडचणीत सापडणार? डॅरेन सॅमीवरील सहा वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल!
सोशल डिस्टन्सिंगसाठी बंद केलं स्टेडियम, पण Viral Videoचा शेवट पाहून बसेल धक्का!
Web Title: ACC likely to wait for ICC's decision on T20 World Cup before taking a call on Asia Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.