PCBच्या आरोपांना जय शाह यांचे उत्तर; भारतच नव्हे तर कोणाचीच पाकिस्तानात खेळण्याची इच्छा नाही

आशिया चषक स्पर्धेच्या ( Asia Cup 2023) यजमानपदावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष  आणि BCCI चे सचिव जय शाह ( Jay Shah) यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 06:20 PM2023-09-05T18:20:27+5:302023-09-05T18:21:27+5:30

whatsapp join usJoin us
ACC president Jay Shah releases lengthy statement after PCB's allegations of staging Asia Cup in Sri Lanka despite rainy conditions | PCBच्या आरोपांना जय शाह यांचे उत्तर; भारतच नव्हे तर कोणाचीच पाकिस्तानात खेळण्याची इच्छा नाही

PCBच्या आरोपांना जय शाह यांचे उत्तर; भारतच नव्हे तर कोणाचीच पाकिस्तानात खेळण्याची इच्छा नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आशिया चषक स्पर्धेच्या ( Asia Cup 2023) यजमानपदावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष  आणि BCCI चे सचिव जय शाह ( Jay Shah) यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात पाठवणार नसल्याची भूमिका BCCI ने घेतल्याने आशिया चषकाचे सामने श्रीलंकेत खेळवले जात आहेत. पण, तेथे पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द करावा लागला, तर भारत-नेपाळ लढतीतही व्यत्यय आला. सुपर ४ च्या लढती कोलंबो येथे होणार आहेत आणि तेथेही पावसाने धुमाकूळ घातला आहे. यावरून PCBने केलेल्या टीकेला जय शांनी आज उत्तर दिले.


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखपदी झालेले बदल अन् अन्य काही कारणांमुळे हा मुद्दा गुंतागुंतीचा झाल्याचे जय शाह यांनी म्हटले. ते म्हणाले, सुरुवातीला ACCचे सदस्य असलेले सर्व संघ, मीडिया हक्क धारक असे अनेक जण पाकिस्तानात आशिया चषकाच्या आयोजनासाठी तयार नव्हते. ही अनिश्चितता देशातील सुरक्षा आणि आर्थिक परिस्थितीशी संबंधित चिंतेमुळे उद्भवली आहे, ” असे जय शाह यांनी निवेदनात म्हटले.  


"ACC अध्यक्ष म्हणून माझ्या क्षमतेनुसार, मी व्यवहार्य आणि परस्पर सहमतीपूर्ण तोडगा काढण्यासाठी वचनबद्ध होतो. यासाठी, मी ACC व्यवस्थापनाच्या सहकार्याने PCBने  प्रस्तावित केलेल्या हायब्रिड मॉडेलचा स्वीकार केला होता. तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की PCBच्या नेतृत्वात अनेक बदल झाले आणि यामुळे विशेषत: सामन्यांसाठी कर सूट आणि विमा यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींबाबत काही वाटाघाटी झाल्या,''हेही त्यांनी स्पष्ट केले. 


ते पुढे म्हणाले, "आशिया चषक २०२२ आवृत्ती UAE मध्ये ट्वेंटी-२०फॉर्मेटमध्ये खेळली गेली. त्यामुळे थेट १०० षटकांच्या वन-डे फॉरमॅटशी तुलना करता येत नाही, यावर जोर देणे महत्त्वाचे आहे. सप्टेंबर महिन्यात UAE मध्ये वन डे सामने खेळण्याने खेळाडूंचा थकवा आणि दुखापतींचा धोका वाढू शकतो, हे लक्षात घेतले गेले. खेळाच्या व्यापक हितसंबंधांना प्राधान्य देण्यावर भर दिला गेला. वर्ल्ड कपसाठी सहभागी संघांचे आरोग्य आणि तयारी सुनिश्चित करताना स्पर्धात्मक आणि यशस्वी स्पर्धेसाठी अनुमती देणारा समतोल राखणे हे उद्दिष्ट होते. ” 
 

Web Title: ACC president Jay Shah releases lengthy statement after PCB's allegations of staging Asia Cup in Sri Lanka despite rainy conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.