India U19 vs Pakistan U19, 3rd Match : १९ वर्षाखालील आशिया कप स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारत-पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना खेळवण्यात येत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात भारताच्या ताफ्यातून १३ वर्षीय वैभव सूर्यंवशीही मैदानात उतरला आहे. तो या सामन्याचे सर्वाधिक आकर्षण असेल. पाकिस्तान संघाने सामना जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंडर १९ संघातील भारत-पाक यांच्यातील मागील दोन सामन्यात भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. ५ पैकी फक्त एक सामना भारतीय संघाने गमावला आहे. त्यामुळे दुबईच्या मैदानात भारतीय संघाचे पारडे जड दिसते.
भारत अंडर १९ प्लेइंग इलेव्हन :
आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, मोहम्मद अमान (कर्णधार), हरवंश सिंग (यष्टिरक्षक), निखिल कुमार, किरण चोरमले, हार्दिक राज, मोहम्मद इनान, समर्थ नागराज, युधाजित गुहा.
पाकिस्तान अंडर १९ प्लेइंग इलेव्हन
शाहजेब खान (कर्णधार), उस्मान खान, साद बेग (यष्टिरक्षक), फरहान युसफ, फहम-उल-हक, मोहम्मद रियाझुल्ला, हारून अर्शद, अब्दुल सुभान, अली रझा, उमर झैब, नावेद अहमद खान.
आशिया कप स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ
आशिया कप स्पर्धेसाठी असा आहे भारताचा अंडर १९ संघ - हार्दिक राज, वैभव सूर्यवंशी, प्रणव पंत, केपी कार्तिकेय, हरवंश सिंग (यष्टिरक्षक), मोहम्मद अमान (कर्णधार), आयुष म्हात्रे, समर्थ नागराज, निखिल कुमार, युधाजित गुहा, चेतन शर्मा, किरण चोरमले, अनुराग कवाडे, आंद्रे सिद्धार्थ सी, मोहम्मद एनान.
आशिया कपसाठी असा आहे पाकिस्तान अंडर १९ संघ- मोहम्मद तय्यब आरिफ, फरहान युसफ, शाहजैब खान (कर्णधार), साद बेग (यष्टिरक्षक), हारून अर्शद, अली रझा, अहमद हुसेन, मोहम्मद रियाजुल्ला, उस्मान खान, अब्दुल सुभान, फहम-उल-हक, मोहम्मद हुजैफा, उमर झैब, मोहम्मद अहमद, नावेद अहमद खान.
Web Title: ACC U19 Asia Cup, 2024 India U19 vs Pakistan U19, 3rd Match Group A Live Cricket Score Tos Updates Pakistan U19 have won the toss and have opted to bat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.