पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिराचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन करण्यात आले. यानिमित्ताने अयोध्येत दीपोत्सव, रांगोळ्या, सर्वत्र सजावट, पूजाअर्चा, आरत्या, शंखनाद, फुलांच्या झळकणाऱ्या माळा यांमुळे प्रत्यक्ष दिवाळी सुरू झाल्याचेच भासत आहे. प्रत्येक जण एकमेकांचे स्वागत जय श्रीरामच्या घोषणेने करीत आहे. विधीवत भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रोच्चारात चांदीच्या विटा ठेऊन राम मंदिराचे भूमिपूजन केले.
मोदी म्हणाले, कन्या कुमारीपासून क्षीर भवानिपर्यंत, सोमनाथपासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयेपासून अमृतसरपर्यंत, आणि लक्ष्यद्विपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय आणि प्रत्येक मन दीपमय आहे. शतकांची प्रतीक्षा आज पूर्ण होत आहे. राम जन्मभूमी आज मुक्त झाली आहे. आज कोट्यवधी भारतीयांची इच्छा आणि आशा पूर्ण झाली. आजच्या या पावन क्षणी सर्वांचे खूप-खूप अभिनंदन. आजच्या दिवसाचा स्वर संपूर्ण जग ऐकत आहे.
भारतात आनंदाचे वातावरण असताना पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं मात्र वादग्रस्त ट्विट केलं. शोएबनं ट्विट केलं की,''जे आपल्याला बदलता येत नाही त्याचा स्वीकार करा अन् जे स्वीकारू शकत नाही, ते बदला.''
...तर सेहवागला हॉटेलमध्येही जाऊन मारलं असतं, शोएब अख्तरचं वादग्रस्त विधान
अख्तर यानं पुन्हा वादग्रस्त विधान केलं. पण, यावेळी त्यानं भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याला मारण्याची भाषा केली. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये अनेक मजेशीर किस्से आहेत आणि ते वारंवरा ऐकावेत असे क्रिकेट चाहत्यांना वाटते. त्यापैकी एक किस्सा भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर यांच्यात घडला होता. त्याच प्रसंगावर अख्तरनं विधान करताना सेहवागला हॉटेलपर्यंत मारत नेले असते असे मत व्यक्त केलं.
16 वर्षांपूर्वी जेव्हा वीरूनं मुल्तान कसोटीत पाकिस्तानविरुद्ध 309 धावांची खेळी केली होती. भारताकडून कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. त्या सामन्यात सेहवागनं पाकिस्तानी गोलंदाजाला डिवचले होते. 2004च्या त्या सामन्यात अख्तर सातत्यानं आखडता चेंडू टाकून सेहवागला त्रास देत होता. सेहवागला त्यानं हुक शॉट मारण्यास सांगितले, परंतु तेव्हा वीरूनं नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या सचिन तेंडुलकरला अशी गोलंदाजी करण्याचा इशारा केला. त्यानंतर तेंडुकरनं अख्तरचा शॉर्ट बॉलवर चौकार खेचला. तेव्हा वीरूनं, बाब-बाप असतो अन् मुलगा-मुलगा. असे म्हणून अख्तरला डिवचले होते.
16 वर्षांनंतर अख्तरला पुन्हा या प्रसंगाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला,''सेहवाग मला असं बोलून वाचला असता का?मी त्याला असंच सोडलं असतं का? त्याला मैदानावर तर मारलंच असतं आणि त्यानंतर हॉटेलमध्येही त्याला सोडलं नसतं.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
शाब्बास! महाराष्ट्राच्या सुपुत्राची आनंद महिंद्रांनी थोपटली पाठ; भन्नाट आयडिया भन्नाट आवडली
भगवान रामाने प्रत्येकाचा चांगुलपणा पाहिला; मोहम्मद कैफच्या ट्विटनं जिंकली मनं
अयोध्या तो झांकी है उसके बाद भी बहुत कुछ बाकी है!; बबिता फोगाटचे ट्विट व्हायरल
आयर्लंडकडून 2011च्या वर्ल्ड कप मधील विजयाची पुनरावृत्ती; इंग्लंडला दिली मात
'तो' वर्ल्ड रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीच्या नावावर राहिला नाही; इयॉन मॉर्गनची सरशी