इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल) 13वा मोसम तोंडावर असताना चेन्नई सुपर किंग्सला धक्के बसले आहेत. त्यांचे दोन खेळाडूंसह 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यात संघाचा उपकर्णधार सुरेश रैनानं वैयक्तीक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आणि तो मायदेशात परतला. त्यामुळे आता अंतिम 11 शिलेदार निवडताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीसमोर आव्हान असणार आहे. त्यात सीएसकेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघातील सर्वात अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगही यंदाच्या आयपीएलमधून माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त ANI ने प्रसिद्ध केलं आहे.
ANI ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने अजून संघ व्यवस्थापनाला अधिकृतपणे कळवलेलं नाही आणि भज्जीनं माघार घेतल्यास संघाला तयार राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. ''त्याने अजूनही अधिकृतपणे काहीच कळवलेलं नाही. आज रात्रीपर्यंत किंवा उद्या आम्हाला त्याचं उत्तर अपेक्षित आहे. पण, त्यानं न खेळण्याचा निर्णय घेतल्यास, संघ व्यवस्थापनाला त्या परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे,'' असे सूत्रांनी सांगितले.
तळ्यात-मळ्यात!भज्जीच्या रुपानं आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. भज्जीनं सीएसकेच्या चेन्नईत झालेल्या सराव शिबिरात सहभाग घेतला नव्हता आणि तो संयुक्त अरब अमिराती येथे नंतर दाखल होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय संघाचा फिरकीपटू मंगळवारी यूएईसाठी रवाना होणार होता, परंतु दुबईतील संघातील कोरोना सदस्यांची संख्या लक्षात घेता, तो पुनर्विचार करत आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
नाइट रायडर्स संघातला 48 वर्षांचा तरुण; जाँटी ऱ्होड्स स्टाईल घेतली कॅच, पाहा व्हिडीओ
संजय राऊतांनी शिवसेनेचं खरं रूप दाखवलं; कंगना Vs. सेना सामन्यात बबिता फोगाटची उडी
IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
IPL 2020 : सुरेश रैनाच्या माघारीनंतर उपकर्णधार कोण? CSKनं उत्तरातून दिले स्पष्ट संकेत