विराटसोबत पकडली फ्लाइट; सेल्फी मिळाल्यावर अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना!

किंग कोहलीच्या जबऱ्या फॅनमध्ये तमिळ अभिनेत्रीचाही समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 06:33 PM2024-09-13T18:33:35+5:302024-09-13T18:35:32+5:30

whatsapp join usJoin us
Actress Radhika Sarathkumar Enjoyed Flight With Virat Kohli Shares Pics And Her Experience | विराटसोबत पकडली फ्लाइट; सेल्फी मिळाल्यावर अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना!

विराटसोबत पकडली फ्लाइट; सेल्फी मिळाल्यावर अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीची झलक पाहायला मिळणं, चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणीच असते. किंग कोहलीच्या जबऱ्या फॅनमध्ये तमिळ अभिनेत्रीचाही समावेश आहे. खुद्द अभिनेत्रीच्या पोस्टमधूनच याचा खुलासा झाला आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली थेट लंडनहून चेन्नईला पोहचला आहे. 

विराट कोहलीच्या फ्लाइटमधूनच प्रवास करत होती ही अभिनेत्री 

विराट कोहलीनं ज्या फ्लाइटमधून लंडन ते चेन्नई असा प्रवास केला त्याच फ्लाइटमधून तमिळ अभिनेत्रीही प्रवास करत होती. विराट कोहलीची भेट झाल्यामुळे अभिनेत्रीचा प्रवास एकदम खास आणि अविस्मरणीय झाला. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट कोहलीसोबतचा खास फोटो शेअर करत आपल्या मनातील आनंदी भावना व्यक्त केल्याचे दिसून येते. 

सेल्फीसाठी अभिनेत्रीनं कोहलीचे मानले आभार


 

अभिनेत्री राधिका सरथकुमार हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून विराट कोहलीसोबतचा फ्लाइटमध्ये काढलेला फोटो शेअर केला आहे. फोटो पोस्ट करताना तिने खास कॅप्शनसह लक्षवेधून घेतले आहे. लोखो चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या विराट कोहलीसोबत प्रवास करण्याचा योग आनंददायी आहे. सेल्फीसाठी धन्यवाद. फोटोमध्ये विराट कोहली आणि अभिनेत्री कॅज्युअल आउटफिट्समध्ये अगदी आरामदायी बसल्याचे दिसत आहेत. विराट कोहलीने एक सिंपल ऑफ-व्हाइट टी-शर्ट घातला आहे. दुसरीकडे अभिनेत्रीनं ग्रे स्वेटशर्टसह लूक परिपूर्ण केल्याचे दिसते. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सची बरसात होताना दिसत आहे.

लंडनहून थेट चेन्नईला पोहचला कोहली

विराट कोहली बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यातून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेआधी कोहली मोठ्या सुट्टीवर होता. सुट्टीच्या कालावधीत पत्नी अनुष्कासोबत त्याने लंडनमध्ये क्वॉलिटी टाइम स्पेंड करण्याला पसंती दिली. आता थेट लंडनहून तो चेन्नईला पोहचला आहे. १९ तारखेपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नई च्या मैदानात रंगणार आहे.

Web Title: Actress Radhika Sarathkumar Enjoyed Flight With Virat Kohli Shares Pics And Her Experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.