दोन दिवसांपूर्वी केन रिचर्डसन व अॅडम झम्पा या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल २०२१तून माघार घेण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाच्या या दोन्ही खेळाडूंनी दोन दिवसांपूर्वी संघाचे बायो बबल सोडलं, परंतु ते अजूनही मुंबईतच अडकले आहेत. या दोन खेळाडूंना सुरक्षित घरी आणण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांच्या सरकारशी चर्चा करत आहेत. या दोघांनीही वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे.ऑस्ट्रेलियानं १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या सर्व विमानसेवांवर बंदी घातली आहे. त्यामुळे १५ मे पर्यंत ही दोघं मायदेशात परत जाऊ शकणार नाहीत. रविवारी २५ एप्रिलला ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही खेळाडूंनी RCBचं बायो बबल सोडलं आणि मुंबई विमानतळानजीक हॉटेलमध्ये शिफ्ट झाले. त्यानंतर RCBचा संघ पुढील टप्प्यासाठी अहमदाबाद येथे रवाना झाला. मोठी बातमी : कोरोना संकटात भारत ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं यजमानपद गमावणार; नव्या पर्यायानं पाकिस्तानात आनंद!
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रवक्त्यांनी क्रिक बजसोबत बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया झम्पा व रिचर्डसन यांना १५ मे पूर्वी ऑस्ट्रेलियात आणण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन व डिपार्टमेंट ऑफ फॉरेन अफेअर व ट्रेड यांच्याशी चर्चा करत आहेत. झम्पा व रिचर्डसन यांच्यासाठी मुंबई ते दोहा आणि तिथून ऑस्ट्रेलिया अशा प्रवासाची सोय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अँड्य्रू टाय हा आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर याच मार्गानं मायदेशात परतला. IPL 2021 : पॅट कमिन्सनंतर KKRच्या आणखी एका खेळाडूचा पुढाकार; गौतम गंभीर फाऊंडेशनला केली मदत
''खेळाडूंना परत आणण्यासाठी सरकार परवानगी देतेय का, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परवानगी मिळाली, तर काहीच चिंता नसेल, परंतु न मिळाल्यास खेळाडूंना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही बीसीसीआयसोबत काम करू,''असे प्रवक्त्यांनी सांगितले. IPL 2021 पूर्ण होणार, BCCIनं घेतली परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी; IPL COOचं मोठं विधान
ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी- पंतप्रधान मॉरिसन
"भारतात आयपीएलसाठी गेलेले खेळाडू हे खासगी प्रवासानं गेले आहेत. ते देशाचा अधिकृत दौऱ्यावर गेलेले नाहीत. ते स्वत:च्या खासगी फ्रँचायझीच्या संसाधनांचा उपभोग घेत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च त्यांची मायदेशात परतण्यासाठीची व्यवस्था करावी", असं स्पष्ट मत पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्यक्त केलं आहे.
ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू अँड्रयू टाय, केन रिचर्डसन आणि अॅडम झम्पा यांनी भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर आयपीएलमध्ये अजूनही ऑस्ट्रेलियाचे १४ खेळाडू खेळत आहेत. यात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅच कमिन्स यांच्यासह प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि सायमन कॅटिच यांचा समावेश आहे. याशिवाय समालोचक मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकेल सॉल्टर आणि लिसा स्थेलकर देखील आयपीएलमध्ये समालोचन पथकाचे सदस्य आहेत.