इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमातही जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला एकमागून एक धक्के बसत आहे. दोन खेळाडूंसह स्टाफ सदस्य अशी एकूण 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उपकर्णधार सुरेश रैनानं घेतलेली माघार CSKसाठी डोकेदुखी ठरणारी आहे.
IPL 2020 : CSKची चिंता वाढतेय; सुरेश रैनाच्या निर्णयानंतर हरभजन सिंगचे 'तळ्यात मळ्यात'!
रैनाच्या जागी CSKच्या संघात मिळणार मराठमोळ्या फलंदाजाला संधी; वॉटसनसोबत करणार ओपनिंग
ऐकीकडे CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचं टेंशन वाढलेलं असताना दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मोठा डाव टाकला. यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती येथे होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर विराट कोहलीचा RCBसंघ बाजी मारेल, असे दावे केले गेले आहेत. त्यादृष्टीनंच विराटच्या संघानं भारी खेळाडूला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे.
OMG: 11 वर्ष सुरू होतं लपूनछपून प्रेम; स्टार खेळाडूचा सावत्र बहिणीसोबत साखरपुडा!
आयपीएलला सुरू होण्यापूर्वीच RCBचा गोलंदाज केन रिचर्डसन यानं माघार घेतल्याचे जाहीर केलं. तो बाप होणार आहे आणि अशावेळी त्यानं पत्नीसोबत राहण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे रिचर्डसनला बदली खेळाडू कोण, याची सर्वांना उत्सुकता होती. रिचर्डसननं 14 आयपीएल सामन्यांत 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याच्या तोडीचा खेळाडू संघात घेणं अपेक्षित होत आणि तसा डाव RCBनं खेळला.
RCBनं रिचर्डसनच्या जागी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पा याची निवड केली. झम्पानं आयपीएलच्या 11 सामन्यांत 7.55च्या इकॉनॉमी रेटनं 19 विकेट्स घेतल्या आहेत. यूएईच्या वातावरणात येथील खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी आहे, त्यामुळे RCBची ताकद वाढली आहे. झम्पाच्या आगमनानं RCBकडे आता युजवेंद्र चहल, मोइन अली, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद आणि पवन नेगी अशी फिरकीपटूंची फौज तयार झाली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Video: ट्वेंटी-20त 195 धावा करूनही पाकिस्तान पराभूत; इंग्लंडनं बदड बदड बदडले!
कोट्याधीश महेंद्रसिंग धोनीकडे झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे 1,800 रुपये थकीत!
हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप
किंग्स इलेव्हन पंजाबची लॉटरी; संघातील मुख्य फलंदाजाचे CPL 2020मध्ये 45 चेंडूंत शतक!
Web Title: Adam Zampa replaces Kane Richardson in the RCB team for the upcoming IPL 2020 season in UAE
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.