कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख 83,326 वर पोहोचला आहे. त्यापैकी 1 लाख 34,616 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब अशी की 5 लाख 10, 350 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 12,456 वर गेली असून 423 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेताल देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. क्रीडा स्पर्धा किती काळ स्थगित ठेवण्यात येतील, याचा अंदाज आताच बांधणे अवघड आहे.
भारतीय क्रिकेट संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. परिस्थिती सुधारल्यास टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल आणि तेथे त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे. अर्थात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होईल की नाही यावरही अनिश्चितता आहे. The Age च्या वृत्तानुसार टीम इंडिया ऑसी दौऱ्यावर गेल्यास एडलेड येथील चार कोटी 20 लाख डॉलर किमतीच्या नव्या हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची सोय केली जाणार आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रमुख किथ ब्रेथशाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुखे केव्हीन रॉबर्ट्स यांच्याकडे तशी विनंती केली आहे.
पाहुण्या संघाला क्वारंटाईनच्या दृष्टीनं कांगारु बेट आणि रोटनेस्ट बेटावर ठेवण्याचाही विचार सुरू आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. 138 खोल्यांचं हॉटेल सप्टेंबरमध्ये खुले होणार असून त्यात टीम इंडियाची सोय केली जाईल. 18 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा...भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात जाणार आहे. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार कसोटी, तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
स्टीव्ह स्मिथ शोकमग्न; सोशल मीडियावरून दिली दुःखद बातमी
Andrew Flintoffचा अजब दावा; म्हणे पृथ्वी गोलाकार नाही, तर...
EXPENSIVE: हार्दिक पांड्याच्या शर्टची किंमत ऐकून येईल चक्कर; इतक्या रुपयात येतील 30-40 ब्रांडेड शर्ट
पाकिस्तानला पडतंय ICCच्या स्पर्धा आयोजनाचं स्वप्न; दावा सांगण्याची तयारी
'या' Hot खेळाडूसोबत टीम इंडियाच्या फलंदाजाला जायचंय डिनरला!
धक्कादायक; Corona Virus मुळे कर्ट अँगलसह अनेक WWE स्टार्स करारमुक्त
कोरोना व्हायरसमुळे स्टार खेळाडूच्या आईचे निधन; महिनाभर सुरू होता संघर्ष