India Cricket Jersey : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी भारतीय संघाच्या नवीन जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. Adidas या किट निर्माता कंपनीने रोहित शर्मा आणि कंपनीसाठी नवीन जर्सी लॉंच केली आहे. Nike नंतर प्रथमच टीम इंडियाच्या जर्सीवर स्पॉन्सर म्हणून प्रसिद्ध क्रीडा वस्तू निर्माता कंपनी दिसणार आहे. या नव्या जर्सीत भारतीय शिलेदार ७ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध WTC फायनलमध्ये खेळणार आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) Adidas कंपनीसोबत ५ वर्षांचा एक मोठा करार केला आहे, जो २०२८ पर्यंत चालेल. लक्षणीय बाब म्हणजे हा करार जवळपास ३५० कोटींचा असल्याचे बोलले जात आहे. भारतीय पुरूष क्रिकेट संघ आणि महिलांचा संघ तिन्ही फॉरमॅटसाठी ही जर्सी परिधान करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. वन डे, ट्वेंटी-२० तसेच कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ वेगवेगळ्या जर्सीत असेल.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
Web Title: Adidas launches new India cricket jersey for all the 3 formats ahead of WTC Final 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.