PAK vs SL Final: "अरे भाई, जरा देख के चलो", दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानच्या फिल्डिंगची उडवली खिल्ली

श्रीलंकेच्या संघाने सहाव्यांदा आशिया चषकाचा किताब जिंकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 12:11 PM2022-09-12T12:11:14+5:302022-09-12T12:12:37+5:30

whatsapp join usJoin us
Ae Bhai, Zara Dekh Ke Chalo Delhi Police make fun of Pakistan's fielding | PAK vs SL Final: "अरे भाई, जरा देख के चलो", दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानच्या फिल्डिंगची उडवली खिल्ली

PAK vs SL Final: "अरे भाई, जरा देख के चलो", दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानच्या फिल्डिंगची उडवली खिल्ली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर पार पडलेल्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) मानकरी यजमान श्रीलंकेचा संघ ठरला आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव करून श्रीलंकेने सहाव्यांदा (SL vs PAK) आशिया चषकाचा किताब पटकावला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरूवातीलाच श्रीलंकेला मोठे झटके दिले. अवघ्या 58 धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र अखेरच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी खराब फिल्डिंग केली ज्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. अशातच दिल्लीपोलिसांनी देखील पाकिस्तानच्या फिल्डिंगचा दाखला देत निशाणा साधला आहे.

दरम्यान, श्रीलंकेकडून अखेरच्या 10 षटकांमध्ये वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा ( Bhanuka Rajapaksa ) यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. 36 चेंडूंत 58 धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा 21 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 36 धावांवर माघारी परतला. मात्र राजपक्षा शानदार फलंदाजी करत होता. राजपक्षाने सातव्या बळीसाठी चमिका करुणारत्नेसह 31 चेंडूंत 54 धावा जोडल्या व संघाला 6 बाद 170 धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने 45 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या.

दिल्ली पोलिसांनी उडवली खिल्ली 
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात देखील पाकिस्तानच्या खेळाडूंनी खराब फिल्डिंग केली. झेल घेत असताना एकाच वेळी दोन फिल्डर चेंडूखाली आल्याचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यावरूनच "अरे भाई, जरा देख के चलो", अशा आशयाचे ट्विट करत दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानच्या फिल्डिंगची खिल्ली उडवली. तसेच #RoadSafety आणि #AsiaCup2022Final हे हॅशटॅग वापरून पोलिसांनी पाकिस्तानची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सध्या रोड सेफ्टी सीरिजचा देखील थरार रंगला आहे. या मालिकेचा मुख्य उद्देश्य रोड सेफ्टीबाबत जागरूकता निर्माण करणे आहे. 

...म्हणून खेळली जाते रोड सेफ्टी मालिका
सचिन रोड सेफ्टीच्या मुद्द्यावरून जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होतो. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज इंडिया इव्हेंटचा उद्देश हा रस्ता आणि वाहतूक सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवणे आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिका लीजेंड्स, बांगलादेश लीजेंड्स, वेस्ट इंडिज लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स आणि न्यूझीलंड लीजेंड्स या संघांचा सहभाग आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्या सामन्यात इंडिया लिजेंड्स संघाने दक्षिण आफ्रिका लीजेंड्सचा पराभव केला.


 

Web Title: Ae Bhai, Zara Dekh Ke Chalo Delhi Police make fun of Pakistan's fielding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.