भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची पत्नी आयशा धवननं सोमवारी इंस्टाग्रामवर वर्णद्वेषावर जोरदार टीका केली. नेटिझन्सनी धवनचा मुलगा झोरावर याला 'Black' असे संबोधले. त्यानंतर तिनं त्याला चांगलच सुनावलं. अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. क्रिकेटपटूंनीही या गोष्टीचा निषेध नोंदवला. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमी, ख्रिस गेल यांनी क्रिकेटमध्येही असा भेदभाव होत असल्याचा दावा केला.
आयशानं मुलाला ब्लॅक म्हणणाऱ्या नेटिझन्सला उत्तर देताना लिहिलं की,''झोरावर तू काळा आहेस आणि काळाच राहणार.'' तिनं या टीकात्मक संदेशासह नेटिझन्सच्या कमेंटचा स्क्रीनशॉटही शेअर केला. तिनं पुढं लिहिलं की,''माझ्या मुलाच्या रंगावर लोकांचं एवढं बारिक लक्ष आहे, हे जाणून मी थक्क झाले. कोण कसं जन्माला येतं, यानं काय फरक पडतो? हास्यास्पद गोष्ट अशी की भारतातील काही लोकांना शरीराच्या रंगावरून प्रॉब्लेम आहे. त्यांचा रंग जगातील अन्य देशांच्या तुलनेत वेगळा असतो. हे म्हणजे तुम्ही स्वतःलाच नाकारण्यासारखं आहे. तुम्ही स्वतःचं अस्तित्व नाकारत आहात.''
शिखर आणि आयशा यांनी 2012मध्ये लग्न केलं आणि 2014मध्ये त्यांना झोरावर हा मुलगा झाला. पत्नी आयशाला पहिल्या लग्नातून दोन मुली आहेत. लग्नानंतर धवननं आयशाच्या दोन्ही मुलींना आपलं नाव दिलं. या मुलींसोबत धवनचं घट्ट नातं आहे. त्यामुळे त्या सावत्र मुली आहेत, हे कुणी म्हणणार नाही.
'अंडरटेकर'वर कोसळला दुःखाचा डोंगर; मोठ्या भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी जग आतुर; शोएब मलिकचा दावा
कोरोनाची धास्ती; हेल्मेट घालून खेळाडू करतोय कसरत, पाहा PHOTO!
घरात आलेल्या पाहूण्यानं सर्वांची उडवली झोप; घ्यावी लागली रेस्क्यू टीमची मदत