Join us  

AFG vs BAN : भाई, हा तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट न घालताच आला! जगासमोर झालं हसू, Video Viral

ICC ODI World Cup BAN vs AFG : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 8:04 PM

Open in App

ICC ODI World Cup BAN vs AFG : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी केली. मेहिदी हसन मिराझ ( Mehidy Hasan Miraz  ) याने अष्टपैलू कामगिरी करून बांगलादेशला सहज विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे या सामन्यात कोसळला आणि त्यामुळे मुजीब उर रहमान घाई घाईत फलंदाजीला आला. पण, एक अत्यंत महत्त्वाची गोष्टच न घालता तो मैदानावर आला. मैदानावर येताच त्याच्या ते लक्षात आले अन् त्याने इशाऱ्याने सहकाऱ्याला ती गोष्ट आणायला सांगितली. बांगलादेशच्या खेळाडूने त्याची मजा घेतली.  

मेहदी हसन मिराझ विरुद्ध स्ट्राइक घेण्यासाठी मुजीबने क्षणार्धात पेट गार्ड घातला. पहिल्या चेंडूवर त्याने एकच धाव घेतली. मिराझच्या पुढच्या षटकात, मुजीब स्लॉगसाठी गेला पण चेंडू पूर्णपणे चुकला. तेव्हा त्याच्या हे लक्षात आले अन्..

बांगलादेशकडून मेहिदी हसन मिराझ आणि नजमूल होसैन शांतो यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ३ विकेट्स घेणाऱ्या मिराझने ७३ चेंडूंत ५ चौकारांसह ५७ धावा केल्या. शांतो ८३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ५९ धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशने ३४.४ षटकांत ४ बाद १५८ धावा करून ६ विकेट्सने सामना जिंकला.

२०१५च्या आवृत्तीपासून आतापर्यंत वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानचा हा सलग १३ वा पराभव होता. बांगलादेशचा १७ वर्षांत भारतीय भूमीवर पहिला वन डे सामना जिंकला. त्यांचे पहिले दोन विजय १९९८ आणि २००६ मध्ये अनुक्रमे केनिया आणि झिम्बाब्वेविरुद्ध मिळाले होते. ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानचा दुसरा सामना भारताशी होणार आहे.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तानबांगलादेशऑफ द फिल्ड