चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील इंग्लंड-अफगाणिस्तान यांच्यातील आठव्या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी प्रत्येकी एक-एक शतक झळकावले. इब्राहिम झाद्रानच्या शतकी खेळीला प्रत्युत्तर देताना इंग्लंडच्या ताफ्यातील जो रुटनं ९८ चेंडूत शतक साजरे केले. त्याच्या या शतकासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक शतकांची नोंद झाली आहे.
२००२ आणि २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत प्रत्येकी १०-१० शतके पाहायला मिळाली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका हंगामात ११ शतकांसह सेट झाला नवा रेकॉर्ड
आठव्या सामन्यात या स्पर्धेत ११ व्या शतक पाहायला मिळाले. आतापर्यंतच्या इतिहासात एका हंगामात दोन वेळा (२००२ आणि २०१७) १० शतकांचा रेकॉर्ड होता. पण आता ११ शतकांसह नवा विक्रम सेट झाला आहे. यंदाच्या हंगामात अजून बरेच सामने शिल्लक असून शतकांच्या 'बरसाती'सह हा विक्रम आणखी भक्कम होईल, अशी अपेक्षा आहे. एका हंगामात सर्वाधिक शतके झळकवण्यात स्पर्धेत सहभागी ८ संघापैकी ७ संघाचा वाटा उचलला. पण यात यजमान पाकच मागे राहिल्याचे दिसून येते.
यात यजमान पाकिस्तानला उचलता आला नाही वाटा
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतेचे यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तान संघावर आधीच साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की ओढावली आहे. आता त्यात आणखी एका रेकॉर्डची भर पडली आहे. एका हंगामात सर्वाधिक शतकांच्या रेकॉर्डमध्ये यजमानांचा वाटा शून्य आहे. अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या फलंदाजांनीही यंदाच्या हंगामात शतक झळकावले आहे. पण दोन सामन्यात पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला शतकी खेळी करता आलेली नाही. हा एक लाजिरवाणा विक्रमच आहे.
यंदाच्या हंगामात ७ संघातील या ११ खेळाडूंनी झळकावली सेंच्युरी, इथं शतकवीरांची यादी
- इब्राहिम झाद्रान -अफगाणिस्तान
- जो रूट - इंग्लंड
- बेन डकेट -इंग्लंड
- टॉम लॅथम - न्यूझीलंड
- शुभमन गिल -भारत
- विराट कोहली - भारत
- जोश इंग्लिस -इंग्लंड
- रचिन रवींद्र -न्यूझीलंड
- तौहिद हृदय -बांगलादेश
- विल यंग - न्यूझीलंड
- रायन रिकेलटन - दक्षिण आफ्रिका
याआधी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील एका हंगामात सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड
- आसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ - पाकिस्तान आणि युएई - ११ शतके
- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २००२/०३ - श्रीलंका - १० शतके
- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ - इंग्लंड - १० शतके
- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २००६/०७ - भारत - ७ शतके
Web Title: AFG vs ENG Joe Root Hit 11th Ton Of This Champions Trophy 2025 Records Most Hundreds In A Single Edition No One Pakistan In This Record Book
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.