Afghanistan vs New Zealand Test: अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रेटर नोएडा येथे खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्याचा चौथा दिवसही वाया गेला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ रद्द होण्यामागचे कारण म्हणजे पाऊस आणि मैदानातील ओलसरपणा. पहिले चारही वाया गेल्याने आता हा कसोटी सामना आता ऐतिहासिक ठरण्याची दाट शक्यता आहे. हे १८९० पासून केवळ ७ वेळा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात घडलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळही रद्द
पहिल्या तीन दिवसांप्रमाणेच कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळही रद्द करण्यात आला. या कसोटी सामन्यात अद्याप एकही चेंडू टाकला गेला नाही. संघांची अवस्था अशी आहे की ते आपल्या हॉटेलच्या खोलीतूनही बाहेर पडत नाहीत. पाचव्या दिवसाबाबत बोलायचे झाले तर, सध्याच्या हवामानानुसार हा कसोटी सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय संपण्याची शक्यता आहे. असे झाल्यास या सामन्याची इतिहासात नोंद होईल. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे आतापर्यंत ७ वेळा घडले आहे. अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळही तसाच रद्द झाला, तर १३४ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये हे आठव्यांदा घडताना दिसेल.
- १८९० पासून ७ वेळा घडला असा प्रकार -
- ऑगस्ट १८९० - ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड
- जुलै १९३८ - ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड
- डिसेंबर १९७० - ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड
- फेब्रुवारी १९८९ - पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड
- मार्च १९९० - वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लंड
- डिसेंबर १९९८ - पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड
- डिसेंबर १९९८ - भारत विरूद्ध न्यूझीलंड