Join us  

बाबर आजमचा वर्ल्ड रेकॉर्ड! रिचर्ड्स, विराट, वॉर्नर यांनाही हे करता नाही आले

AFG vs PAK : अफगाणिस्तानने पहिल्या वन डे सामन्यात ५९ धावांत गाशा गुंडाळला होता, परंतु दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 8:53 PM

Open in App

AFG vs PAK : अफगाणिस्तानने पहिल्या वन डे सामन्यात ५९ धावांत गाशा गुंडाळला होता, परंतु दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. पाकिस्तानसमोर विजयासाठी ३०१ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तानने ठेवले आहे आणि कर्णधार बाबर आजमने धावांचा पाठलाग करतान वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे.

रहमनुल्लाह गुरबाज ( १५१) आणि इब्राहिम झाद्रान ( ८०) यांनी पहिल्या विकेटसाठी २२७ धावांची विक्रमी भागीदारी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. गुरबाजने १४ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करून पाकिस्तानविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळी करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले. या दोघांच्या व्यतिरिक्त मोहम्मद नबीने २९ व हशमतुल्लाह शाहिदीने १५* धावांची खेळी केली. अफगाणिस्तानने ५ बाद ३०० धावा केल्या.

प्रत्युत्तरात ५२ धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला आहे. फखर जमान ( ३०) माघारी परतल्यानंतर इमाम-उल-हक आणि बाबर आजम यांनी डाव सावरला आहे. बाबरचा हा १०० वा वन डे सामना आहे आणि वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या १०० इनिंग्जमध्ये ५०००+ धावा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत ९९ इनिंग्जमध्ये १८ शतकं झळकावली आहेत. तटस्थ ठिकाणी १०० वन डे सामना खेळणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला आहे. 

 

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानअफगाणिस्तानविराट कोहली
Open in App