Join us  

पाकिस्तानच्या नादात अफगाणिस्तानला विसरलो; उपांत्य फेरीत तेही पोहचू शकतात, पाहा कसे

ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 1:57 PM

Open in App

ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. न्यूझीलंडने गुरुवारी श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आणि उपांत्य फेरीच्या चौथ्या स्थानावर दावा सांगितला. उपांत्य फेरीत आता भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अशा लढती होणार आहेत. पण, अजून ट्विस्ट बाकी आहे. पाकिस्तानजरी स्पर्धेबाहेर गेले असले तरी अफगाणिस्तान अजूनही शर्यतीत आहेत आणि त्यांनी आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरही उपांत्य फेरीचं गणित ठेवलं गेलंय..

भारत ( १६ गुण), दक्षिण आफ्रिका ( १२) व ऑस्ट्रेलिया ( १२) यांनी उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली आहे. चौथ्या क्रमांकासाठी न्यूझीलंड जवळपास पक्के आहेत. पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी ८ गुण आहेत आणि ते त्यांचा अखेरचा साखळी सामना जिंकून न्यूझीलंडशी ( १०) बरोबरी करू शकतील. पण, नेट रन रेटच्या जोरावर त्यांना मागे सोडणे पाकिस्तान व अफगाणिस्तान दोघांनाही शक्य नाही. न्यूझीलंड ०.७४३ अशा नेट रन रेटसह आघाडीवर आहेत.  पाकिस्तानचे उपांत्य फेरीसाठीचे गणित

प्रथम फलंदाजी केल्यास- ३०० धावा केल्यास इंग्लंडला १३ धावांवर गुंडाळावे लागेल- २८७ धावांनी विजय आवश्यक - ३५० धावा केल्यास इंग्लंडला ६३ धावांवर गुंडाळावे लागेल- २८७ धावांनी विजय आवश्यक - ४०० धावा केल्यास इंग्लंडला ११२ धावांवर गुंडाळावे लागेल- २८८ धावांनी विजय आवश्यक     प्रथम गोलंदाजी आल्यास- इंग्लंडने ठेवलेले लक्ष्य ३ षटकांत पार करावे लागेल.  

अफगाणिस्तानसाठीचं गणित- प्रथम फलंदाजी स्वीकारल्यामुळे अफगाणिस्तानला आजचा सामना ४३४ धावांनी जिंकावा लागेल. 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तानद. आफ्रिका