AFG vs SA : ऐतिहासिक! हम किसी से कम नहीं; अफगाणिस्ताननं करुन दाखवलं, आफ्रिकेची नाचक्की

afg vs sa news : अफगाणिस्तानने प्रथमच वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:33 PM2024-09-19T12:33:24+5:302024-09-19T12:52:40+5:30

whatsapp join usJoin us
afg vs sa odi 2024 Afghanistan register first-ever ODI win over South Africa, read here details | AFG vs SA : ऐतिहासिक! हम किसी से कम नहीं; अफगाणिस्ताननं करुन दाखवलं, आफ्रिकेची नाचक्की

AFG vs SA : ऐतिहासिक! हम किसी से कम नहीं; अफगाणिस्ताननं करुन दाखवलं, आफ्रिकेची नाचक्की

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

afg vs sa odi 2024 : सध्या अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली. (Afghanistan vs South Africa 1st ODI 2024 Scorecard) इतिहासात प्रथमच अफगाणिस्तानने आफ्रिकेला वन डे सामन्यात पराभवाची धूळ चारली. बुधवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या लढतीत नवख्या अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी कमाल केली. आफ्रिकेला अवघ्या १०६ धावांत गुंडाळण्यात त्यांना यश आले. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने २६ षटकांत ४ बाद १०७ धावा करुन विजय साकारला. यासह अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी करताना प्रथमच आफ्रिकेचा पराभव करण्याची किमया साधली.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना अफगाणिस्तानने मुसंडी मारली. सुरुवातीपासूनच सामन्यात पकड बनवण्यात त्यांना यश आले. आफ्रिकेकडून वियन मुल्डर (८४ चेंडूत ५२ धावा) वगळता एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. अफगाणिस्तानकडून फझलहक फारुकीने शानदार कामगिरी करताना चार बळी घेतले, तर अल्लाह गजानफरने तीन आणि राशिद खानने दोन बळी घेतले. 

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकत फलंदाजीची निवड केली. पण डावात एकेकाळी आफ्रिकेची अवस्था ७ बाद ३६ इतकी वाईट झाली होती. सलामीवीर रिझा हेंड्रिक्स (९), टोनी डी जॉर्जी (११), एडन मार्करम (२), ट्रिस्टन स्टब्स (०), कायल वेरियने (१०), जेसन स्मिथ (०) आणि अँडिल फेलुक्वायो (०) हे पहिले सात फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. अखेर दक्षिण आफ्रिकेचा संघ ३३.३ षटकांत सर्वबाद अवघ्या १०६ धावा करू शकला. दरम्यान, मागील काही कालावधीपासून अफगाणिस्तानच्या संघाने बड्या संघांना पराभूत केले आहे. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांचा देखील त्यांनी पराभव केला आहे. 

Web Title: afg vs sa odi 2024 Afghanistan register first-ever ODI win over South Africa, read here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.