अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय तडाखेबाज खेळाडू क्रिकेटपटू नजीब ताराकाई याचे आज निधन झाले आहे. नजीब ताराकाईच्या निधनाने अफगाणिस्तानसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात मोठा धक्का बसला आहे. नजीब ताराकाई याचे शुक्रवारी भीषण अपघात झाले होते. या अपघातानंतर तो कोमात गेला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने देखील नजीब ताराकाईच्या मृत्यूनंतर ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
नजीह तारकाईच्या अपघातानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच एसीबीनेही सर्जरी केल्यानंतरही त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली होती. तसेच एसीबीकडून तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली जात आहे, असं ट्वीट करण्यात आलं होतं.
29 वर्षीय नजीब यानं एक वन डे आणि 12 ट्वेंटी-20 सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केलं आहे. 2017मध्ये त्यानं आयर्लंड विरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यांत 90 धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात अफगाणिस्ताननं 17 धावांनी आयर्लंडला पराभूत केले होते. 2019मध्ये त्यानं बांगलादेशविरुद्ध ढाका येथे अखेरचा ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
नजीब तारकाई 24 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 47.20च्या सरासरीनं 2030 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6 शतकं आणि 10 अर्धशतकं आहेत. श्पागीजा क्रिकेट लीगमध्ये त्यानं नुकतीच दमदार फटकेबाजी केली होती. त्यानं नाइटसंघासाठी काबुल इगल्स विरुद्ध 22 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 32 धावा केल्या. त्यानं संपूर्ण कारकिर्दीत 33 ट्वेंटी-20 सामने खेळले आणि त्यात 700 धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 17 सामन्यांत 553 धावा आहेत.