विश्वचषकात मोठा उलटफेर! अफगाणिस्ताननं इंग्लंडची 'झोप' उडवली; गतविजेत्यांचा दारूण पराभव

ICC ODI World Cup 2023 : वन डे विश्वचषकात आज अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळवला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 09:32 PM2023-10-15T21:32:38+5:302023-10-15T21:38:18+5:30

whatsapp join usJoin us
 Afghanistan beat England by 69 runs in ENG vs AFG match in ICC ODI world cup 2023, Mujeeb Ur Rehman and Rashid Khan took 3 each and Mohammad Nabi took 2 wickets  | विश्वचषकात मोठा उलटफेर! अफगाणिस्ताननं इंग्लंडची 'झोप' उडवली; गतविजेत्यांचा दारूण पराभव

विश्वचषकात मोठा उलटफेर! अफगाणिस्ताननं इंग्लंडची 'झोप' उडवली; गतविजेत्यांचा दारूण पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ENG vs AFG Live Match | नवी दिल्ली : अफगाणिस्तानने वन डे विश्वचषकात मोठा उलटफेर करत गतविजेत्या इंग्लंडचा पराभव केला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने एकतर्फी झुंज दिली पण मुजीब उर रहमानने ६१ धावांवर असताना त्याचा त्रिफळा काढून इंग्लिश संघाच्या विजयाच्या आशांवर पाणी टाकले. आज वन डे विश्वचषकात दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना पार पडला. हॅरी ब्रूक वगळता एकाही इंग्लिश फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी सर्वाधिक ३-३ बळी घेतले, तर मोहम्मद नबीने दोन फलंदाज माघारी पाठवले. याशिवाय फजलहक फारुकी आणि नवीन-उल-हक यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. अखेर इंग्लंडचा संघ ४०.३ षटकांत २१५ धावांवर सर्वबाद झाला अन् अफगाणिस्तानने ६९ धावांनी मोठा विजय मिळवून इतिहास रचला. 

दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा (९) नवीन-उल-हकने त्रिफळा काढला, तर जो रूट मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर चीतपट झाला. मागील सामन्यातील शतकवीर डेव्हिड मलानला (३२) मोहम्मद नबीने बाहेरचा रस्ता दाखवला. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनला तंबूत पाठवून राशिद खानने सामन्यात रंगत आणली आणि तिथूनच अफगाणिस्तानने विजयाकडे कूच केली. 

अफगाणिस्ताननं इंग्लंडची 'झोप' उडवली
तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिन झादरान यांनी पहिल्या बळीसाठी ११४ धावांची मोठी भागीदारी नोंदवली. गुरबाज धावबाद झाल्यानंतर अफगाणिस्तानची गाडी रूळावरून घसरली. गुरबाजने ४ षटकार आणि ८ चौकारांच्या जोरावर ५७ चेंडूत ८० धावांची शानदार खेळी केली. १४० च्या सरासरीने धावा करून त्याने गतविजेत्यांनी डोकेदुखी वाढवली होती. गुरबाज बाद झाल्यानंतर इंग्लिश संघाने पुनरागमन केले. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (१४), अजमतुल्ला उमरझाई (१९) आणि राशिद खान (२३) यांनी साजेशी खेळी करून डाव पुढे नेला. इक्रम अलीखिलने ५८ धावांची अर्धशतकी खेळी करून गतविजेत्या इंग्लंडसमोर सन्मानजनक आव्हान ठेवले. सावध खेळी करून अफगाणिस्तानचा डाव पुढे नेत असलेला इक्रम अर्धशतक करून बाद झाला. सुरूवातीला स्फोटक खेळी करणाऱ्या अफगाणिस्तानला शेवट चांगला करण्यात अपयश आले अन् अफगाणिस्तानचा संघ ४९.५ षटकांत २८४ धावा करू शकला. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी २८५ धावांचे आव्हान होते, ज्याचा पाठलाग करण्यात गतविजेत्यांना अपयश आले. 

आजच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ -
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झादरान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - 
जोस बटलर (कर्णधार), डेव्हिड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल राशिद, मार्क वुड, रीस टोपली.

Web Title:  Afghanistan beat England by 69 runs in ENG vs AFG match in ICC ODI world cup 2023, Mujeeb Ur Rehman and Rashid Khan took 3 each and Mohammad Nabi took 2 wickets 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.