Join us  

T20 World Cup 2022 : वर्ल्ड कप जिंकल्यावरच लग्न करणार! क्रिकेटरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाहीर झाला तगडा संघ

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची आजची अखेरची तारीख आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 2:50 PM

Open in App

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची आजची अखेरची तारीख आहे. पाकिस्तान व न्यूझीलंड हे संघ वगळता बाकी सर्वांनी आपापले वर्ल्ड कप संघ जाहीर केले आहेत. गुरुवारी वेस्ट इंडिजनेही त्यांचा संघ जाहीर केला आणि पाठोपाठ अफगाणिस्तानने संघाची घोषणा केली. काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खान ( Rashid Khan) याने वर्ल्ड कप जिंकेपर्यंत लग्न करणार नाही, असे विधान केले होते आणि त्याची बरीच चर्चा रंगली होती. आशिया चषक २०२२ स्पर्धेतील अफगाणिस्तानने आपल्या कामगिरीने भल्याभल्यांना अचंबित केले. आता हा संघ वर्ल्ड कप विजयाच्या शर्यतीत दिसल्यास कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे राशिदचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने १५ सदस्यीय तगडा संघ जाहीर केला आहे.

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत वर्ल्ड कप होणार आहे. त्यासाठी अफगाणिस्तानने आजच्या डेड लाईनच्या दिवशी संघाची घोषणा केली. आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानने श्रीलंका व बांगलादेश यांच्यावर रोमहर्षक विजय मिळवला, तर भारत व पाकिस्तान या तगड्या संघांना कडवी टक्कर दिली होती. पण, आशिया चषक स्पर्धेतील संघात समावेश असलेल्या शमिउल्लाह शिनवारी, हशमतुल्लाह शाहिदी, अस्फार झजाई, करिम जनत व नूर अहमद यांना वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातून वगळण्यात आले. मधल्या फळीतील फलंदाज दारवीश रसूली, अष्टपैलू क्वैस अहमद व जलदगती गोलंदाज सलिम साफी यांचा १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. अस्फार झजाई, शराफुद्दीन अश्रफ, रहमत शाह व गुलबदीन नैब यांना राखीव खेळाडू म्हणून निवडले गेले आहे.

मी असं म्हणलोच नव्हतो... वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लग्न करणार, असे विधान व्हायरल झाल्यानंतर राशिद खानने त्यावर स्पष्टिकरण दिले. मी असं म्हणालोच नव्हतो, असे त्याने सांगितले. त्याने म्हटले होते की, ते विधान ऐकून मलाच धक्का बसला होता, खरं सांगतोय मी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लग्न करेन, असं म्हटलंच नव्हतं. मी म्हणालेलो आगामी काळात तीन वर्ल्ड कप ( २०२१ व २०२२ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०२३ वन डे वर्ल्ड कप ) स्पर्धा आहेत. त्यामुळे तुर्तास तरी लग्नावर नव्हे तर वर्ल्ड कप स्पर्धांवर माझं लक्ष आहे.

अफगाणिस्तानचा संघ - मोहम्मद नबी ( कर्णधार), नजिबुल्लाह झाद्रान ( उप कर्णधार), रहमनुल्लाह गुर्बाझ, अझमतुल्लाह ओमार्झाइ, दारवीश रसूली, फारिद अहमद मलिक, फझल हक फारूकी, हझरतुल्लाह झजाई, इब्राहिम झाद्रान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, क्वैस अहमद, राशिद खान, सलिम साफी, उस्मान घानी ( Afghanistan T20 World Cup Squad: Mohammad Nabi (c), Najibullah Zadran (vc), Rahmanullah Gurbaz (wk), Azmatullah Omarzai, Darwish Rasooli, Farid Ahmad Malik, Fazal Haq Farooqi, Hazratullah Zazai, Ibrahim Zadran, Mujeeb ur Rahman, Naveen ul Haq, Qais Ahmad, Rashid Khan, Salim Safi, Usman Ghani )  

अफगाणिस्तानचे वेळापत्रक२२ ऑक्टोबर - वि. इंग्लंड, पर्थ२६ ऑक्टोबर - वि. न्यूझीलंड, मेलबर्न२८ ऑक्टोबर - वि. पात्रता फेरीतील संघ, मेलबर्न१ नोव्हेंबर - वि. पात्रता फेरीतील संघ, ब्रिस्बन ४ नोव्हेंबर - वि. ऑस्ट्रेलिया, एडिलेड९ व १० नोव्हेंबर - उपांत्य फेरीचे सामने१३ नोव्हेंबर - अंतिम सामना  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2अफगाणिस्तान
Open in App