अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू असफर झझाई याच्या गाडीचा रविवारी अपघात झाला आणि त्यात तो थोडक्यात वाचला. त्याच्या गाडीच्या बोनेटचा चुराडा झाला. 26 वर्षीय यष्टिरक्षकाच्या डोक्याला थोडा मार लागला. मीडिया मॅनेजर एम इब्राहिम मोमांड यांनी ही माहिती दिली. त्यांनी गाडीसह झझाईचा पट्टी लावलेला फोटो शेअर केला.
त्यानं ट्विट केलं की,''राष्ट्रीय यष्टिरक्षक असफर झझाई हा गाडी अपघातात थोडक्यात बचावला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे आणि त्याच्या गाडीचा चुराडा झाला आहे. तो लवकर बरा होईल ही प्रार्थना.'' त्याचा हा अपघात कुठे झाला, याबाबत पूर्ण माहिती मिळालेली नाही.
भारताविरुद्ध जून 2018 मध्ये झालेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात तो अफगाणिस्तान संघाचा सदस्य होता. त्यानंतर गतवर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मोहम्मद शाहजाद याला बदली खेळाडू म्हणून त्याला बोलावण्यात आले होते. त्यानं 2013मध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमधून पदार्पण केलं. त्यानं आतापर्तंय 17 वन डे आणि तीन कसोटी सामने खेळले आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
गौतम गंभीरकडून MS Dhoniचं कौतुक; विराट कोहलीच्या पाठीशी ठाम उभा राहिला नसता तर...
WWE सुपरस्टार 'अंडरटेकर' निवृत्त; त्याचं खरं नाव तुम्हाला माहित्येय?
७५० विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचं निधन; सचिन तेंडुलकरनं वाहिली श्रद्धांजली
Fact Check : पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद इरफानचा मृत्यू? पीसीबीच्या ट्विटनंतर चर्चेला उधाण
विराट कोहलीच्या नवीन घड्याळाची किंमत एवढी की निघेल पाकिस्तानी क्रिकेपटूचा दीड महिन्याचा पगार
The Undertaker Retirement : अंडरटेकर अन् केन यांच्यात खरंच होतं का रक्ताचं नातं?
The Undertaker Retirement : या आलिशान घरात राहणाऱ्या अंडरटेकरची संपत्ती कितीय माहित्येय?