Join us  

अफगाणिस्तानकडे धोनीसारखा खेळाडू, मोहम्मद नबी ‘कूल’ कर्णधार

Afghanistan : अफगाणिस्तानकडे काही असे खेळाडू जे जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळतात. त्यामुळे या खेळाडूंकडे अनुभवदेखील आहे आणि आत्मविश्वासदेखील आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 5:47 AM

Open in App

- स्ट्रेट ड्राईव्ह(सुनील गावसकर)

टी-२० एक असा फॉर्मेट आहे, त्यात कोणत्याही संघाला दावेदार म्हटले जाऊ शकत नाही. प्रारूप जेवढे लहान असेल, तेवढे मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. कारण त्यासाठी एक चांगले षटक फलंदाजी करणाऱ्या संघाचे भाग्य बदलू शकते आणि एक खराब ओव्हर गोलंदाजी करणाऱ्या संघाला नुकसानीत टाकू शकते. अफगाणिस्तानकडे काही असे खेळाडू जे जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळतात. त्यामुळे या खेळाडूंकडे अनुभवदेखील आहे आणि आत्मविश्वासदेखील आहे.

अफगाणिस्तानकडे चांगल्या गोलंदाजांची कमतरता नाही. या लहान प्रारूपात जर ते काही चांगली षटके टाकून बळी मिळवत असतील आणि धावा रोखण्यात यशस्वी होऊ शकत असतील; तर समजावे की, त्यांनी त्यांचे काम केले आहे. प्रारूप इतके लहान आहे की, फलंदाजांना बॉल किती वळतो, हे कळण्यासाठी वेळ देता येत नाही. डॉट बॉल वेगाने खेळाला बदलून टाकतो. अफगाणिस्तानकडे मोहम्मद नबीच्या रूपाने एमएसडीप्रमाणे कूल खेळाडू आहे. कठिण परिस्थितीतदेखील तो शांत राहतो आणि बॉल आणि बॅटने सामना जिंकून देण्याची क्षमता ठेवतो.

राशिद खान हा अफगाण क्रिकेटला मिळालेली एक भेट आहे. कारण तो समर्पित आणि शानदार खेळाडू आहे. तो ज्या संघाकडून खेळतो तेथे झोकून देतो, त्यामुळे खेळ जिवंत राहतो. वेगाने लेग स्पिन करणे ही त्याची ताकद आहे. त्यासोबतच तळाच्या क्रमातदेखील तो चांगली फलंदाजी करतो आणि क्षेत्ररक्षणातही तो उत्तम आहे. त्याच्या या क्षमतेमुळेच प्रत्येक फलंदाजाला असे वाटते की, तो आपल्या संघात असावा. राशिद हा खेळभावनेनेच सामन्याचा आनंद घेतो. चेहऱ्यावर असलेले स्मितहास्य त्याला वेगळ्याच पातळीवर नेते.

अफगाणच्या बाकीच्या खेळाडूंबाबत सर्वांना जास्त माहिती नाही. मात्र, जेव्हा हा विश्वचषक संपेल, तेव्हा हे खेळाडू पुन्हा जगभरातील विविध टी-२० क्रिकेट लीगमध्ये दिसतील. अफगाणिस्तानचा संघ हा इतरांसाठी धोकादायक आहे आणि जो त्या संघाला कमकुवत समजण्याची चूक करेल, त्याला त्याचा परिणाम भोगावा लागेल. स्कॉटलंडने शानदार खेळ करत या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

या प्रारूपात संघाने आश्चर्यकारक प्रदर्शन केले. या संघाला फिरकीविरोधात खेळताना अडचणी येतात. कारण देशांतर्गत त्यांच्याकडे चांगले फिरकीपटू नाहीत. अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना बघण्यासाठी फारसे प्रेक्षक येणार नाहीत. मात्र, टी-२० लीगसाठी टॅलेंट स्काऊट्स हा सामना नक्की पाहतील.  (टीसीएम)

टॅग्स :अफगाणिस्तानमहेंद्रसिंग धोनी
Open in App