World Cup 2023 - अफगाणिस्तानने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीसोबत पंगा घेणाऱ्या नवीन उल हकचे ( Naveen-ul-Haq ) दोन वर्षांनंतर अफगाणिस्तानच्या वन डे संघात पुनरागमन झाले आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेसाठी नवीनला संघात स्थान मिळाले नव्हते. पण, सीनियर अष्टपैलू खेळाडू गुलबदीन नैब याला आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही वर्ल्ड कप संघात स्थान मिळालेले नाही.
हशमतुल्लाह शाहिदी याच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतील ४ खेळाडूंना वर्ल्ड कप संघात स्थान मिळालेले नाही. नैबसह करिम जनत, शराफुद्दीन अश्रफ आणि सुलिमान सफी यांनाही वर्ल्ड कप स्पर्धेतून वगळण्यात आलेले आहे. अझमतुल्लाह ओमार्झाई याचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे त्याला आशिया चषकात खेळता आले नव्हते. २०२१ मध्ये शेवटचा लिस्ट ए सामना खेळणाऱ्या नवीनचेही पुनरागमन झाले आहे. त्याने आतापर्यंत ७ वन डे सामन्यांत २५.४२च्या सरासरीने १४ विकेट्स घेतल्या आहेत. सहा वर्षांच्या गॅपनंतर जनतला आशिया चषकासाठी संघात स्थान दिले गेले होते, परंतु त्याला वर्ल्ड कप संघातून वगळले.
अफगाणिस्तानचा संघ - हशमतुल्लाह शाहिदी ( कर्णधार), रहमनुल्लाह गुर्बाझ, इब्राहिम झाद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजिबुल्लाह झाद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलिखिल, अझमतुल्लाह ओमारझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक ( Afghanistan World Cup squad: Hashmatullah Shahidi (c), Rahmanullah Gurbaz, Ibrahim Zadran, Riaz Hassan, Rahmat Shah, Najibullah Zadran, Mohammad Nabi, Ikram Alikhil, Azmatullah Omarzai, Rashid Khan, Mujeeb ur Rahman, Noor Ahmad, Fazalhaq Farooqi, Abdul Rahman, Naveen-ul-Haq.)
Web Title: Afghanistan have announced their 15-member squad for World Cup 2023, Naveen-ul-Haq returns after two years in squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.