नवी दिल्ली : आशिया चषकाच्या स्पर्धेसाठी सर्व सहा देशांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानविरूद्धची वन डे मालिका गमावल्यानंतर अफगाणिस्ताननं आपला संघ जाहीर केला. आगामी स्पर्धेत भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या संघांचा समावेश असेल. ३० ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या आशिया चषकातील सलामीचा सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान इथं खेळवला जाईल. रविवारी अफगाणिस्ताननं १७ सदस्यीय संघ जाहीर केला असून, हशमतुल्लाह शाहिदीच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अफगाणिस्तानी संघ आपल्या मोहिमेची सुरूवात ३ सप्टेंबर रोजी बांगलादेशविरूद्धच्या सामन्यातून करेल. या स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाईल.
आशिया चषकासाठी अफगाणिस्तानचा संघ -
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, आय अलीखेल, राशिद खान, गुलबदीन नैब, करीम जनात, अब्दुल रहमान, एस अशरफ, मुजीब उर रहमान, नूर अहमद, एस सफी आणि फजलहक फारूकी.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन)
आशिया चषकासाठी पाकिस्तानी संघ -
बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उस्मान मीर, फहीम अशरफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.
आशिया चषकासाठी नेपाळचा संघ -
रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्टेल, आसिफ शेख, भीम शर्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंह ऐरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतीश जीसी, मौसम ढकाल, संदीप झोरा, किशोर महतो, अर्जुन साउद.
आशिया चषकासाठी बांगलादेशचा संघ -
शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजीद हसन तमीम, नाजमुल हुसैन शांतो, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, मेहदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसैन, अफीफ हुसैन, शरीफुल इस्लाम, इबादत हुसैन, मोहम्मद नईम.
आशिया चषकासाठी श्रीलंकेचा संघ -
क्रीडा मंत्रालयाच्या मंजुरीच्या अधीन : दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, चारिथ असलंका, सदीरा समरविक्रमा, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, दुनिथ वेलेझ, महिष थिक्शाना, प्रमोदनुस, प्रमोदनुस, राजकुमार राजकुमार मधुशंका, मथिशा पाथीराणा.
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल
Web Title: Afghanistan, India, Nepal, Pakistan, Bangladesh and Sri Lanka have announced their squads for the Asia Cup 2023 and the tournament is starting from August 30
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.