अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकने बिग बॅश लीग सोडल्याची घोषणा केली आहे. खरे तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्च महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध नियोजित असलेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका न खेळवण्याच्या निर्णय घेतला आहे. याच्या निषेधार्थ नवीनने हा निर्णय घेला आहे. नवीन उल हक बीबीएलमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळत होता. या मोसमात त्याने दोन सामने खेळले आणि दोन विकेट्स घेतल्या आहेत. नवी म्हणाला, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा बालिश निर्णय घेतला आहे. यामुळे आपण स्पर्धेतून माघार घेत आहोत.
अफगाणिस्तानमधील महिलांचे अधिकार कमी केल्याच्या निषेधार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही मालिका न करण्याचा निर्णय घेतला. तालिबानने अलीकडेच अफगाण महिलांना विद्यापीठात शिकण्यास आणि एनजीओमध्ये काम करण्यासही बंदी घातली आहे.
यासंदर्भात ट्विट करत नवीन म्हणाला, "हे सांगायची वेळ आली आहे की, ते जोवर बालिश निर्णय घेणे थांबवणार नाहीत तोवर आपण बिग बॅश लीगमध्ये खेळणार नाही. त्यांनी आधी एकमेव कसोटी सामना रद्द केला आणि आता ते एकदिवसीय सामा खेलत नाहीत. एक देश जो कठीण काळातून मार्गक्रमण करत आहे, त्याला मदत करण्याऐवजी, आपण त्यांच्याकडून आनंदाचे एकमेव कारणही हिरावून घेत आहात."
कोण आहे नवीन -
नवीन उल हक हा एक उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. त्याला IPL 2023 च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने 50 लाख रुपयांत विकत घेतले आहे. तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत आहे. नवीनने अफगाणिस्तानसाठी सात एकदिवसीय सामन्यांमध्ये 14, तर 22 टी-20 सामन्यांमध्ये 31 बळी घेतले आहेत.
Web Title: Afghanistan star player pacer naveen ul haq quits big bash league after australia cancel odi series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.