अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. याशिवाय त्याने इस्पितळातील एक फोटो देखील शेअर केला. "तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांसाठी खूप खूप आभार... शस्त्रक्रिया चांगली पार पडली आणि आता विश्रांती घेत आहे", असे राशिदने कॅप्शनमध्ये म्हटले.
बीग बॅश लीगमधून माघार
पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे राशिद खानने ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश लीगच्या (BBL) यंदाच्या हंगामातून आपले नाव मागे घेतले आहे. तो बीबीएलमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्स संघाकडून खेळतो. बीबीएलचा तेरावा हंगाम ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तर २४ जानेवारीला अंतिम सामना होणार आहे. राशिद खान २०१७ पासून बीग बॅश लीग खेळत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ६९ सामन्यांमध्ये ९८ बळी घेतले आहेत.
राशिद खानने शेवटचा सामना यंदाच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळला. राशिदला यंदाच्या विश्वचषकात साजेशी कामगिरी करण्यात यश आले. त्याने ९ सामन्यांत ४.४८च्या सरासरीनुसार ११ बळी घेतले, तर ९४.५९च्या सरासरीनुसार १०५ धावा केल्या.
Web Title: Afghanistan star spinner Rashid Khan undergoes lower-back surgery and he miss bbl 2023 season read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.