'टेस्ट'मध्ये अफगाणिस्तानची 'बेस्ट' कामगिरी; ६९९ धावांसह पाकचा विक्रम मोडत सेट केला नवा रेकॉर्ड

पाकिस्तानी संघानं १९५८ मध्ये सेट केलाला रेकॉर्ड मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:53 IST2024-12-31T10:51:28+5:302024-12-31T10:53:03+5:30

whatsapp join usJoin us
Afghanistan's 'best' score in 'Test'; Set a new world record by breaking Pakistan's record with 699 runs | 'टेस्ट'मध्ये अफगाणिस्तानची 'बेस्ट' कामगिरी; ६९९ धावांसह पाकचा विक्रम मोडत सेट केला नवा रेकॉर्ड

'टेस्ट'मध्ये अफगाणिस्तानची 'बेस्ट' कामगिरी; ६९९ धावांसह पाकचा विक्रम मोडत सेट केला नवा रेकॉर्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Afghanistan Breaks Pakistan Record In Test: अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला. फलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दोन्ही संघांनी कसोटी क्रिकेटमधील आपापल्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम नोंदवला. अफगाणिस्तानच्या संघाने तर ६९९ धावा करत पाकिस्तानच्या ६६ वर्षांपूर्वीच्या विक्रमाला सुरुंग लावल्याचेपाहायला मिळाले. दोन फलंदाजांच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने कसोटी इतिहासात नवा कारनामा करुन दाखवला आहे.

अफगाणिस्तानच्या संघानं पाकच्या विक्रमाला लावला सुरुंग

झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी मालिकेत अफगाणिस्तानच्या संघानं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ६०० पेक्षा अधिक धावासंख्या उभारण्याचा पराक्रम करून दाखवला. अफगाणिस्तानने आपल्या दहाव्या कसोटी सामन्यात ही कमाल केलीये. टीम इंडियाविरुद्ध २०१८ मध्ये अफगाणिस्तानच्या संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. झिम्बाब्वे विरुद्धच्या कामगिरीसह सर्वात कमी कसोटी सामन्यात ६०० पेक्षा अधिक धावा करण्याच्या खास विक्रमाला अफगाणिस्तानने गवसणी घातली. याआधी हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या नावे होता.

पाकनं  ६६ वर्षांपूर्वी सेट केला होता हा खास विक्रम

पाकिस्तानच्या संघाने १९५२ पासून कसोटी खेळायला सरुवात केली. १९५८ मध्ये १९ व्या सामन्यात पाक संघानं पहिल्यांदा ६०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. याबाबतीत अफगाणिस्तानच्या संघानं वेस्ट इंडिज संघालाही मागे टाकले आहे. कॅरेबियन संघानं २७ व्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा ६०० धावसंख्येचा आकडा गाठला होता. 

झिम्बाब्वेनं उभारली कसोटीतील आपली सर्वोच्च धावंसख्या

झिम्बाब्वेच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात ५८६ धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. संघाकडून सीन विलियम्स याने सर्वाधिक १५४ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय कर्णधार क्रेग इर्विन याने १०४ धावा आणि दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या २१ वर्षीय ब्रायन बॅनेट याने नाबाद ११० धावांचे योगदान दिले.

अफगाणिस्तानच्या संघाकडून दोघांच्या द्विशतकासह एक शतकी खेळी

या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाने पहिल्या डावात ६९९ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून रहमत शाह आणि हसमत उल्लाह शहिदी यांनी द्विशतके झळकावली. याशिवाय विकेट किपर बॅटर अफसर जजईच्या भात्यातून शतक आले. झिम्बाब्वेनं आपल्या दुसऱ्या डावात ३४ षटकात ४ बाद १४२ धावा केल्या. सरशेवटी हा सामना ड्रॉ झाला. 

Web Title: Afghanistan's 'best' score in 'Test'; Set a new world record by breaking Pakistan's record with 699 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.