AFGvsZIM : नजीबुल्लाह झाद्रान ( Najibullah Zadran) यानं शनिवारी तुफान फटकेबाजी केली. झिम्बाब्वेविरुद्धच्या ( Afghanistan vs Zimbabwe 3rd T20) तिसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात अफगाणिस्तानच्या झाद्राननं चौकार-षटकारांची आतषबाजी करताना संघाला ७ बाद १८३ धावांचा डोंगर उभा करून दिला. त्यानंतर गोलंदाजांनी कमाल करताना झिम्बाब्वेला ५ बाद १३६ धावांवर रोखले. अफगाणिस्ताननं हा सामना ४७ धावांनी जिंकून ट्वेंटी-२० मालिका ३-० अशी खिशात घातली. या विजयासह अफगाणिस्तानचा कर्णधार असघर अफघान ( Asghar Afghan ) यानं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. विराट कोहली-रोहित शर्मा सलामीला येणार, भारतीय संघात एक मोठा बदल
प्रथम फलंदाजीला आलेला सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाझ ( १८) याला अपयश आलं. उस्मान घानी ( ३९) आणि करीन जनत ( २१) यांनी अफगाणिस्तानचा डाव सावरला. त्यानंतर झाद्राननं ३५ चेंडूंत नाबाद ७२ धावा चोपल्या. त्यात त्यानं ५ चौकार व ५ षटकार खेचून अवघ्या १० चेंडूंत ५० धावा जोडल्या. अफगाणिस्ताननं ७ बाद १८३ धावा कुटल्या. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाची कमाल, २७ धावांत ४ विकेट्स अन् संघानं मिळवला १७२ चेंडू व ८ विकेट्स राखून विजय
प्रत्युत्तरात २० वर्षीय पदार्पणवीर फारूकीनं झिम्बाब्वेला धक्का दिला. तारीसाई मुसाकांडा ( ३०), सिकंदर रझा ( ४१*) आणि रियान बुर्ल ( ३९*) यांनी संघर्ष केला. पण, त्यांना ५ बाद १३६ धावाच करता आल्या. हा विजय कर्णधार असघर अफघान याच्यासाठी विक्रमी ठरला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त सर्वाधिक ४२ सामने जिंकणाऱ्या कर्णधाराचा मान त्यानं पटकावला. महेंद्रसिंग धोनीनं ७२ सामन्यांत ४१ विजय मिळवले होते. अफघाननं ५२ सामन्यांत ४२ विजय मिळवले. IPL 2021 : आयपीएलपूर्वी खेळाडूंना घ्यावी लागणार कोरोना लस?; फ्रँचायझीची BCCIकडे विनंती
Web Title: AFGvsZIM : Asghar Afghan has surpassed MS Dhoni as the most successful captain in T20 Internationals with 42 wins
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.