Join us  

पहिल्या सामन्यात नाणेफेकीपूर्वी झालं असं काही... मैदानावर पसरली धुराची चादर

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 7:36 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. भारताच्या गोलंदाजांनी फक्त 150 धावांमध्ये बांगलादेशचा पहिला डाव आटोपला. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे त्यांची दिवसअखेर 1 बाद 86 अशी स्थिती आहे. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचे स्वप्न भारतीय संघ बघत आहे. भारताचा संघ सध्या 64 धावांनी पिछाडीवर आहे. आजपासूनच अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात झाली. लखनौ येथे हा सामना सुरू आहे. पण, या सामन्याला काही कारणास्तव विलंब झाला. नाणेफेक होण्यापूर्वीच मैदानावर अचानक धुराची चादर पसरली...

वन डे मालिकेत वेस्ट इंडिज संघानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. विंडीजनं तीनही वन डे सामने जिंकले. त्यामुळे ट्वेंटी-20 त अफगाणिस्तानचा संघ त्याचा वचपा काढेल अशी अपेक्षा आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी ग्राऊंड्समनकडून कीटनाशक फवारणी करण्यात आली त्यामुळे संपूर्ण मैदानावर धुराची चादर पसरली अन् सामन्याला विलंब झाला.

 

पोलार्डचा आगाऊपणा, अंपायरला No Ball चा निर्णय मागे घेण्यास भाग पाडलंवर्ल्ड कप आणि भारताविरुद्धच्या मालिकेतील अपयशानंतरही वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानं जेसन होल्डरकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेतली. त्यांनी किरॉन पोलार्डकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली. पोलार्डच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजनं नुकताच अफगाणिस्तानविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2014नंतर वेस्ट इंडिजनं पहिलीच वन डे मालिका जिंकली. विंडीजनं तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली.

पण,या सामन्यात एक अशी घटना घडली की पोलार्ड नेटिझन्सच्या रडारवर आला. लखनौ येथे खेळवण्यात आलेल्या या मालिकेत पोलार्डनं अखेरच्या सामन्यात अंपायरला चक्क निर्णय बदलण्यास भाग पाडले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची अवस्था 24 षटकांत 4 बाद 97 अशी केली होती. त्यानंतर कर्णधार पोलार्ड गोलंदाजीला आला.

32 वर्षीय पोलार्डनं पहिलाच चेंडू नो बॉल होता. पण, पंचांचा निर्णय एकताच त्यानं चेंडू फेकला नाही. त्यामुळे पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला आणि डेड बॉल जाहीर करण्यात आला. पोलार्डनं असा डाव करून संघाचा एक फ्री हिट वाचवला. पोलार्डनं 5 षटकांत एकही विकेट न घेता 20 धावा दिल्या. रोस्टन चेसनं 44 धावांत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. अल्झारी जोसेफनं 59 धावांत 2 विकेट घेतल्या. अफगाणिस्ताननं 7 फलंदाज गमावून 249 धावा केल्या. हझरतुल्लाह झझाई, असघर अफघान आणि मोहम्मद नबी यांनी अर्धशतकी भागीदारी केली. प्रत्युत्तरात शे होपनं 145 चेंडूंत नाबाद 109 धावा करताना संघाला विजय मिळवून दिला.  

टॅग्स :वेस्ट इंडिजअफगाणिस्तानभारत विरुद्ध बांगलादेश