लाहोर: भारतीय जनता पार्टीने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 काढून टाकल्यानंतर पाकिस्तानींचा जळफळाट झालेला पाहायला मिळत आहे. त्यात पाकिस्तानी क्रिकेटपटू काश्मीरी जनतेचे सांत्वन करण्याची संधी सोडत नाहीत. पाकचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि कर्णधार सर्फराज अहमदनंतर आता पाकच्या आणखी एका क्रिकेटपटूनं काश्मीरी जनतेचं सांत्वन करणारे ट्विट केले आहे.
आफ्रिदीनं हे कलम हटवणं म्हणजे काश्मीरी जनतेच्या हक्कावर गदा आणणे असं ट्विट केलं होतं. त्यावर भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने आफ्रिदीला चांगलेच सुनावले होते. सोमवारी सर्फराजने एक विधान केले. तो म्हणाला, आम्ही पाकिस्तानी काश्मीरी नागरिकांच्या पाठिशी आहोत. अल्लाहने त्यांच्यावरील दु:ख लवकरच दूर करावे अशी प्रार्थना करतो."
त्यात रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरची भर पडली आहे. त्यान एका दुखापतग्रस्त लहान मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर त्याने लिहिले की," बलिदानाचा अर्थ तूम्ही सांगितला. तुमच्या स्वातंत्र्यासाठी मी प्रार्थना करतो."