क्रिकेटचे पुनरागमन : 117 दिवसांनंतर होणार पहिला आंतरराष्ट्रीय सामना, जाणून घ्या नवे नियम, वेळ अन् ठिकाण

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनंही ( आयसीसी) एक व्हिडीओ पोस्ट करून क्रिकेटचे स्वागत केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 05:56 PM2020-07-07T17:56:15+5:302020-07-07T17:57:00+5:30

whatsapp join usJoin us
After a 117 days International Cricket is is set to resume with England vs West Indies Test series, know new rules and time  | क्रिकेटचे पुनरागमन : 117 दिवसांनंतर होणार पहिला आंतरराष्ट्रीय सामना, जाणून घ्या नवे नियम, वेळ अन् ठिकाण

क्रिकेटचे पुनरागमन : 117 दिवसांनंतर होणार पहिला आंतरराष्ट्रीय सामना, जाणून घ्या नवे नियम, वेळ अन् ठिकाण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे13 मार्चला सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना खेळला गेला. कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवे नियम..

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. 13 मार्चला सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना खेळला गेला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका स्थगित झाल्या. पण, आता 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना बुधवारी एजीस बाऊल येथे सुरू होणार आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 कोटींच्या वर गेला आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धांना स्थगिती देण्यात आली आहे. मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा झालेल्याच नाहीत. त्यामुळे इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. वेस्ट इंडिजचा संघ 15-20 दिवसांपूर्वीच येथे दाखल झाला असून त्यांनी 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर सरावही केला. इंग्लंडच्या खेळाडूंनीही तीन दिवसांचा सराव सामना खेळला आहे. त्यामुळे दोन्ही संघ पुन्हा एकदा मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आतूर आहेत.


कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवे नियम..

  • कोरोना व्हायरसचा बदली खेळाडू - कसोटी सामन्यात एखाद्या खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यास त्याच्या जागी आता संघाला बदली खेळाडू खेळवता येईल. बदली खेळाडूला सामनाधिकारी मंजूरी देतील. पण, हा नियम वन डे आणि ट्वेंटी-20 सामन्यांसाठी लागू नसेल.
  • थुंकी किंवा घामाच्या वापरावर बंदी - चेंडू चमकावण्यासाठी थुंकी किंवा घामाचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. चेंडूबाबतचा निर्णय पंच घेतील. नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास खेळाडूंना वॉर्निंग दिली जाईल. दोन वेळा वॉर्निंग देऊनही खेळाडूंनी न ऐकल्यास संघाला 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येत पाच धावा जोडल्या जातील.  

  • तटस्थ पंच नसेल - कोरोना व्हायरसमुळे आलेल्या बंधनामुळे सध्यातरी स्थानिक पंचांची सामन्यासाठी नियुक्ती केली जाईल.  
  • अतिरिक्त DRS - प्रत्येक संघाला प्रत्येक डावासाठी अतिरिक्त DRS दिला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात प्रती डावासाठी तीन,तर मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी दोन DRS घेता येणार आहेत.   

दोन्ही संघ

  • इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अ‍ॅन्डरसन, जोफ्रा आर्चर, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर (उपकर्णधार), जॅक क्राऊली, ज्यो डेनली, ओली पोप, डोम सिब्ली, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
  • राखीव खेळाडू : जेम्स ब्रेसे, सॅम कुरेन, बेन फोक्स, डेन लॉरेन्स, जॅक लीच, शाकिब महमूद, क्रेग ओव्हर्टन, ओली रॉबिन्सन, आॅली स्टोन.

  • वेस्ट इंडिज: जेसन होल्डर ( कर्णधार), जेर्मेन ब्लॅकवूड, एन. बोनर, क्रेग ब्रॅथवेट, एस ब्रुक्स, जॉन कॅम्बेल, रोस्टन चेस, रहकीम डॉवरीच, चेमार होल्डर, शे होप, अल्झारी जोसेफ, रेयमन रेईफर, केमार रोच.
  • राखीव खेळाडूः सुनील अँम्ब्रिस, जोशूआ डासिल्वा, सॅनॉन गॅब्रीयल, किऑन हार्डिंग, कायले मेयर्स, प्रेस्टॉन मॅकस्वीन, मार्क्वीनो मिंडली, शेन मोसेली, अँडरसन फिलिप, ओशाने थॉमस, जोमेल वॉरिकन
  • थेट प्रक्षेपण - सोनी सिक्स
  • सामन्याची वेळ - दुपारी 3.30 वाजल्यापासून

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महेंद्रसिंग धोनीला पत्नी साक्षीकडून रोमँटिक शुभेच्छा; सांगितला बर्थ डे प्लान

माही, तो 'टफ कॉल' घ्यायची हीच ती वेळ, कारण...

काश्मीर खोऱ्यात पहारा देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे Unseen Photo व्हायरल!

महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!

समुद्रात उभं असलेलं लाईटहाऊस पाहिलं की कायम तुझी आठवण येते; केदार जाधवंच भावनिक पत्र

महेंद्रसिंग धोनीला DJ Bravoचं अनोखं गिफ्ट; पाहा भन्नाट गाणं

मुंबई पोलिसांच्या MS Dhoniला काव्यात्मक शुभेच्छा; नावात शोधलं सोशल डिस्टन्सिंग!

Do You Know : महेंद्रसिंग धोनीचे जाहिरात अन् क्रिकेट व्यतिरिक्त 'हे' सात इन्कम सोर्स!

Web Title: After a 117 days International Cricket is is set to resume with England vs West Indies Test series, know new rules and time 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.