मुंबई : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये एक चर्चा जोरदार रंगत आहे. ही चर्चा सुरु आहे ती क्रिकेट विश्वातील गेल्या २० वर्षांपूवीच्या एका रहस्याबद्दल.
आज तब्बल २० वर्षांपूर्वीचे एक रहस्य उलघडले आहे. त्यानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ही गोष्ट जर तुम्ही वाचाल तर चक्रावून जालं. कारण २० वर्षांपूर्वी एक अशी गोष्ट घडली होती, जी काही दिवसांपर्यंत कोणालाही माहिती नव्हती.
क्रिकेटच्या मैदानात काही गोष्टी तुम्हाला चक्रावून टाकतात. एखादी गोष्ट अशी घडते की ती अनाकलनीय असते. कारण काही क्षणात एखादी गोष्ट अशापद्धतीने बदलते की, सामन्याचे रुप बदलून जाते. तुम्ही हे कसे घडले याचा विचार करत बसता, पण आता क्रिकेट विश्वातील एक रहस्य आता २० वर्षांनी उलगडल्याचे समोर आले आहे.
इंग्लंडच्या कर्णधाराने हे एक रहस्य उलगडले आहे. हा सामना 20 वर्षांपूर्वी झाला होता. त्यावेळी एक सामना इंग्लंड जिंकेल, असे वाटत नव्हते. पण हा सामना समोरून जिंकण्याची संधी त्यांना देण्यात आली. त्यावेळी ही गोष्ट इंग्लंडच्या कर्णधाराला कळली नाही. पण त्यानंतर त्यांनी जे काही पाहिले ते धक्कादायक होते.
याबाबत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन म्हणाला की, " आमचा सेंच्युरीन येथे दक्षिण आफ्रिकेबरोबर सामना होता. त्यावेळी आमच्या संघाचे नेतृत्व नासीर हुसेन करत होता. त्याचबरोबर या मालिकेत यापूर्वीचे दोन्ही सामने यजमानांनी जिंकले होते. सलग १४ कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम यावेळी त्यांच्या नावावर होता."
वॉन पुढे म्हणाला की, " या मालिकेतील तिसरा सामना आम्ही जिंकू, असे मला वाटत नव्हते. कारण आम्हाला जिंकण्यासाठी २४५ धावांचे आव्हान होते. हे आव्हान खडतर वाटत होते. पण आम्ही फक्त दोन फलंदाज गमावून हा सामना जिंकला. यावळी आफ्रिकेचे कर्णधार हन्सी क्रोनिए यांनी हा सामना आम्हाला जिंकायला दिला होता. जेव्हा क्रोनिएला मॅच फिक्संगमध्ये पकडले गेले तेव्हा मला यावर विश्वास बसला."