IND vs BAN, Rishabh Pant : फ्लॉप रिषभ पंतची बांगलादेश दौऱ्यातून माघार? अपयशामुळे नव्हे, तर समोर येतंय वेगळंच कारण

भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत १-० अशी हार मानावी लागली. भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेची तयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 04:57 PM2022-11-30T16:57:15+5:302022-11-30T16:59:12+5:30

whatsapp join usJoin us
After a flop show Rishabh Pant now under scanner for BACK INJURY, Will he be replaced for Bangladesh tour?  | IND vs BAN, Rishabh Pant : फ्लॉप रिषभ पंतची बांगलादेश दौऱ्यातून माघार? अपयशामुळे नव्हे, तर समोर येतंय वेगळंच कारण

IND vs BAN, Rishabh Pant : फ्लॉप रिषभ पंतची बांगलादेश दौऱ्यातून माघार? अपयशामुळे नव्हे, तर समोर येतंय वेगळंच कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत १-० अशी हार मानावी लागली. भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेची तयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात होते. पहिल्या सामन्यात ३००+ धावा करूनही भारताला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पुढील दोन सामन्यांत पावसाने व्यत्यत आणला. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल आदी सीनियर खेळाडूंना विश्रांती दिल्याने किवींविरुद्ध युवा खेळाडू मैदानावर उतरले होते. तिसऱ्या वन डे सामन्यात भारताचा डाव २१९ धावांत गडगडला आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंडने १ बाद १०४ धावा केल्या. पावसाच्या आगमनामुळे हा सामना रद्द करावा लागला. रिषभ पंतचा ( Rishabh Pant) फॉर्म या संपूर्ण मालिकेत चर्चेचा विषय ठरला. आता भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यामालिकेतून रिषभ माघार घेण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या वन डे सामन्यांत रिषभ १० धावांवर बाद झाला. आता भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे, परंतु रिषभ या दौऱ्यावर जाणार नसल्याची शंका निर्माण झाली आहे. ४ डिसेंबरपासून या दौऱ्यावरील वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे.  


रिषभ पंतने मागील सहा वन डे सामन्यांत १०, १५, १२५, ०, ५६ आणि १८ धावा केल्या आहेत. वन डेतील कामगिरी ही ट्वेंटी-२० पेक्षा चांगली झालेली आहे. त्याने २०२२मध्ये १२ वन डे सामन्यांत २२३ धावा केल्या आहेत. 


- आजच्या सामन्यात बाद झाल्यानंतर रिषभ पंत ड्रेसिंग रुममध्ये पाठीवर उपचार घेतानाचा फोटो व्हायरल झाला आणि त्यामुळे त्याच्या बांगलादेश दौऱ्याला मुकण्याची चर्चा सुरू झाली आहे. 
- चार दिवसानंतर बांगलादेशविरुद्धची वन डे मालिका चार दिवसांनी सुरू होणार आहे आणि इतक्या कमी वेळात रिषभ दुखापतीतून सावरण्याची शक्यता कमी आहे 

भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार ), लोकेश राहुल ( उप कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत ( यष्टीरक्षक), इशान किशन ( यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल , पी सुंदर, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: After a flop show Rishabh Pant now under scanner for BACK INJURY, Will he be replaced for Bangladesh tour? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.