नवी दिल्ली : प्रत्येक गोष्ट करण्याची एक वेळ असते, असे म्हणतात. खेळायचेही एक वय असते, पण तब्बल 80 वर्षांनंतर एका व्यक्तीने क्रिकेटच्या मैदानाला अलविदा केल्याचे आज पाहायला मिळाले आणि साऱ्यांनीच भुवया उंचावल्या.
वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी यष्टीरक्षक म्हणून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून ते क्रिकेटची सेवा करत आहेत. 1961 साली त्यांनी पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवले आणि आतापर्यंत ते आतापर्यंत ते क्रिकेटची सेवा करत होते. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असो किंवा विराट कोहली, कुणाचेही पान त्यांच्याशिवाय हलत नव्हते. त्यामुळेच त्यांच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटची हानी झाल्याचे म्हटले जात आहे.
दलजित सिंग, असे त्यांचे नाव आहे. यष्टीरक्षक म्हणून ते 87 प्रथम श्रेणी सामने खेळले. यामध्ये त्यांनी 3964 धावा करताना सात शतके आणि 19 अर्धशतके लगावली. त्याचबरोबर यष्ट्यांमागे त्यांनी 225 बळी मिळवले. क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी जवळपास 22 वर्षे पीच क्युरेटर म्हणूनही काम पाहिले. बीसीसीआयने त्यांना भारतातील क्युरेटरचे प्रमुखही बनवले होते.
विकेटकीपर टीम में खेलने वाले दलजीत के नाम 87 फर्स्ट क्लास मैचों में कुल 225 शिकार रहे। उनके नाम कुल 3964 रन हैं जिसमें कुल 7 शतक और 19 अर्धशतक शामिल हैं।
भर रस्त्यात 'गब्बर' शिखर धवनने गाडी थांबवून दिले फ्लाइंग किस, पाहा व्हिडीओ...
नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर शिखर धवनची सेलिब्रेशन करण्याची स्टाइल भन्नाट आहे. आपल्या सेलिब्रेशनसाठी धवन चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. मैदानात फलंदाजी करताना जर धवनने शतक झळकावले तर त्याची दोन्ही हात वर करण्याची निराळी पद्धत आहे. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करताना झेल पकडल्यावर धवन कबड्डी स्टाइलमध्ये सेलिब्रेशन करताना दिसतो. पण आता तो चर्चेत आला आहे तो भर रस्त्यावर गाडी थांबवून फ्लाइंग किस दिल्यामुळे.
सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. पण धवन हा भारताच्या संघात नसल्याने तो भारतामध्ये आहे. भारतामध्ये आज सकाळी धवन गाडीतून जात होता. तेव्हा त्याने एका व्यक्तीला फ्लाइंग किस दिल्याचे पाहायला मिळाले. धवन गाडी चालवत असताना रस्त्याच्या कडेला एक मुलगा उभा होता. त्या मुलाला धवनने किस दिल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: After almost 80 years, he said goodbye to the cricket ground
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.